6 dead and around 39 people injured after a bus fell into a gorge in Jharkhands Garhwa | झारखंडमध्ये बस दरीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, 39 जखमी
झारखंडमध्ये बस दरीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, 39 जखमी

गढवा: झारखंडमधील गढवा-अंबिकापूर मार्गावर जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 14 किलोमीटर अंतरावर बसचा अपघात झाला. छत्तीसगडमधील अंबिकापूरहून गढवा येथे जाणारी बस दरीत कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. 
बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. आतापर्यंत 18 जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका महिला प्रवाशाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अद्यापही काही प्रवासी बसखाली दबल्याची माहिती मिळते आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


Web Title: 6 dead and around 39 people injured after a bus fell into a gorge in Jharkhands Garhwa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.