कर्मचारी काम करत नसल्याने ५ दिवसांचा आठवडा रद्द; १ एप्रिलपासून पुन्हा ६ दिवस कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:07 AM2020-03-11T01:07:40+5:302020-03-11T10:13:06+5:30

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे़

5-day week canceled because employees are not working; 6 working days again from 1st April pnm | कर्मचारी काम करत नसल्याने ५ दिवसांचा आठवडा रद्द; १ एप्रिलपासून पुन्हा ६ दिवस कामकाज

कर्मचारी काम करत नसल्याने ५ दिवसांचा आठवडा रद्द; १ एप्रिलपासून पुन्हा ६ दिवस कामकाज

Next

गंगटोक : सरकारी कर्मचारी काम करीत नसल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याऐवजी दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़
गेल्या वर्षी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा तेथे सत्तेत आला. १ मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले़ त्यात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सरकारी आस्थापनांच्या कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णयही घेतला आणित्याची अंमलबजावणी सुरू झाली.

राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे़ पाच दिवसांचा आठवडा रद्द केला असला, तरी सरकारी कर्मचाºयांना दुसºया व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळणार आहे़

महाराष्ट्रातही राज्य सरकारी कर्मचाºयांना २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे़ पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारी कर्मचारी करीत होते़ ती गेल्या महिन्यात पूर्ण झाली़ त्या बदल्यात दररोजच्या कामकाजाची ४५ मिनिटे वाढविली आहेत. शाळा, रुग्णालय, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवा पाच दिवसांच्या आठवड्यातून वगळण्यात आल्या आहेत़ 

कर्मचाºयांचे काम सुधारले नाही
कामावर असलेल्या पाच दिवसांत गेल्या वर्षभरात सरकारी कर्मचाºयांनी समाधानकारक कामगिरी केली नाही़ कार्यप्रणालीत अपेक्षित बदल झाला नाही़ शनिवार व रविवारची सुट्टी मिळूनही अन्य दिवशी कर्मचाºयांचे काम सुधारले नाही, असे सरकारच्या निदर्शनास आले़

Web Title: 5-day week canceled because employees are not working; 6 working days again from 1st April pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार