पहिल्या सहामाहीत बँक फसवणुकीचे ४० गुन्हे; सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:22 AM2020-06-15T04:22:26+5:302020-06-15T04:22:54+5:30

फसवणुकीची रक्कम १४,४२९ कोटी

40 cases of bank fraud in the first half | पहिल्या सहामाहीत बँक फसवणुकीचे ४० गुन्हे; सीबीआयची कारवाई

पहिल्या सहामाहीत बँक फसवणुकीचे ४० गुन्हे; सीबीआयची कारवाई

Next

नवी दिल्ली : २०२० च्या पहिल्या सहामाहीत सीबीआयने बँक फसवणुकीचे ४० गुन्हे दाखल केले आहेत. फसवणुकीची कर्जाची ही रक्कम १४,४२९ कोटी आहे.

या सर्व ४० प्रकरणांत तक्रारदार बँक आहे. २०२० मधील हाय प्रोफाईल बँक घोटाळा म्हणजे येस बँकेचा आहे. मार्चमध्ये सीबीआयने राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले. घोटाळ्यात ज्या अन्य लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात वाधवान आणि गौतम थापर यांचा समावेश आहे. ईडीने राणा कपूरविरुद्ध मनीलाँड्रिंगचे आरोपपत्र दाखल केले आहे. याची सीबीआय चौकशी सध्या सुरू आहे. सीबीआयने जानेवारीत देशात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुंबईत फ्रॉस्ट इंटरनॅशनलने १४ बँकांच्या समूहाची ३५९२ कोटींची फसवणूक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याचे संचालक उदय देसाई आणि सुजय देसाई यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे.

Web Title: 40 cases of bank fraud in the first half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.