36 children deteriorated due to eating contaminated mid day meal in bhilwara Rajasthan | राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा
राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा

ठळक मुद्देराजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा.राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेतील घटना.उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जयपूर - राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली. मंगळवारी (13 ऑगस्ट) मुलांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता. मात्र तो खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जाबरकिया खेड्यातील एका सरकारी माध्यामिक शाळेतील 36 मुलांना विषबाधा झाली आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात आलेला कढी-भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना दूषित कढी भात दिला गेला असा आरोप करण्यात आल्याची  माहिती करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 


 


Web Title: 36 children deteriorated due to eating contaminated mid day meal in bhilwara Rajasthan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.