lokmat Supervote 2024

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना घेरले  घेतले आहे. जैशचे दहशतवादी कंगन गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही चकमक सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे.

यापूर्वी, पुलवामा जिल्ह्यातील त्रल येथे सुरक्षा दलांनी मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. अवंतीपोरा येथील सैमोह गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम राबविली. सैनिकांनी दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले होते, परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला.

अनेक तासांच्या गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन दहशतवादी ठार केले. त्यांच्याकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला आहे. हे दोन्ही दहशतवादी अंसार गजावत-उल-हिंद (एजीएच) या दहशतवादी संघटनेत काम करायचे. पुलवामा येथे सुरक्षा दलाने सलग तिसर्‍या दिवशी चकमक केली.

याआधी लष्कराने नियंत्रण रेषेत (एलओसी) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मेंढर सेक्टरमध्ये 10 आणि नौशेरा सेक्टरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांकडून सैन्याने 2 एके 47, यूएस रायफल, चिनी पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त केले.

 

आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

 

जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका

जम्मू - काश्मीर : पुलवामा येथे सुरक्षा दलास मोठे यश, पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्थान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच  https://t.co/CbvSFUB0GJ

— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020

Web Title: 3 Jaish terrorists strangled in Pulwama; Search operation by Army continues pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.