२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:22 PM2021-11-08T14:22:19+5:302021-11-08T14:22:58+5:30

More Suicides Among Businessmen Than Farmers, NCRB Reports: कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली.

In 2020, more suicides were committed by traders than farmers, the NCRB report revealed | २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

२०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिकांनी केल्या अधिक आत्महत्या, NCRBच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर 

Next

नवी दिल्ली - २०२० मध्ये कोरोनाच्या फैलावामुळे जगाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवहार जवळपास बंद झाल्याने आर्थिक संकटही गंभीर बनले. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन संकटात सापडले. त्यामुळे भारतात व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. २०१९ शी तुलना केली असता २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताजा आकडेवारीनुसार सन २०२० मध्ये ११ हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यादरम्यान १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.  या ११ हजारांहून अधिक आत्महत्यांमध्ये ४ हजार ३५६ व्यापाऱ्यांनी तर ४ हजार २२६ दुकानदारांनी आत्महत्या केली. तर अन्य आत्महत्या ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत.

एनसीआरबीने या तीन कॅटॅगरीना बिझनेस समुदायाशी जोडून एकूण आकडेवारी नोंदवली आहे. २०१९ शी तुलना केली असता बिझनेस समुदायामध्ये २०२० मध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यापारी लोकांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणामध्ये २०१९ मधील २९०६ आत्महत्यांच्या तुलनेत २०२० मध्ये ४३५६मध्ये ४९.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर संपूर्ण देशामध्ये आत्महत्येच्या प्रमाणामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही संख्या वाढून १ लाख ५३ हजार ०५२ एवढी झाली आहे.

पारंपरिकपणे व्यावसायिकांमध्ये शेतकऱ्यांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण कमी दिसून येते. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायितांना खूप नुकसानीचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली. तसेच कर्जफेक करू न शकल्याने त्यांवा दिवाळखोर व्हावे लागले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायझेसचे सेक्रेटरी जनरल अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात. मात्र एनसीआरबीच्या आकड्यांमधून समजते की, व्यावसायिकसुद्धा खूप दबावामध्ये आणि तणावामध्ये आहे. तसेच कोरोनाच्या साथीने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट केली आहे.  

Web Title: In 2020, more suicides were committed by traders than farmers, the NCRB report revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.