१७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 11:34 AM2021-03-02T11:34:02+5:302021-03-02T11:46:51+5:30

Organ Donation : सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या.

17 year old boy brain dead in Dholpur Rajasthan, Family donate his organ to 5 people | १७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला!

१७ वर्षीय सेवारामची अशीही सेवा, मरता मरता पाच लोकांना जीवनदान देऊन अमर झाला!

googlenewsNext

राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर(Dholpur) जिल्ह्यातील गंगा दास गावातील १७ वर्षीय मुलाचं निधन झालं नाही तर तो अमर झाला आहे. त्याच्या कुटुंबियांनी तो ब्रेनडेड झाल्यावर सेवारामचे अवयव दान(Organ Donation) केले. ज्यामुळे पाच लोकांनी जीवनदान मिळालं आहे. त्यामुळेच सेवाराम (Sewaram) मरण पावला नाही तर तो अमर झाला आहे.

सेवारामच्या शरीरातील अवयव आता पाच लोकांच्या शरीरात जिवंत राहणार आहेत. सेवाराम तर आता या जगात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी मात्र राहिल्या. त्याचे आई-वडील आता पाच लोकांमध्ये आपला मुलगा बघतील. आई-वडिलांनी मोठ्या गर्वाने आपल्या मुलाचं नाव सेवाराम ठेवलं होतं. तो मरता मरताही त्या नावाला खरं ठरवून गेला.

धौलपूर जिल्ह्यातील १७ वर्षीय सेवारामची १६ फेब्रुवारीला बाइक स्लीप झाली होती. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नंतर त्याला ग्वालिअरला घेऊन गेले. पण तरी त्याची तब्येत काही सुधारली नाही. नंतर त्याला जयपूरमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इथे त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. (हे पण वाचा : हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!)

डॉक्टरांनी सेवारामच्या कुटुंबियांना समजावलं आणि अवयव दान करण्याचा सल्ला दिला. यावर त्याचे कुटुंबिय तयार झाले. ज्यामुळे पाच लोकांना जीवनदान मिळाले आहे. अवयव दान केल्यानंतर सोमवारी एसएसएस हॉस्पिटलमध्ये जयपूरच्या चिकित्सा टिमने त्याला शहीदाचा दर्जा देत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. इतकेच नाही तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करून सेवारामच्या कुटुंबियांचे आभार मानले. (हे पण वाचा : VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!)

सेवारामचं पार्थिव जेव्हा गावात पोहोचलं तेव्हा एकीकडे दुखंही वाटत होतं तर दुसरीकडे त्याचा अभिमानही वाटत होता. कारण त्यांच्या सेवारामने जाता जाता ५ लोकांचा जीव वाचवला होता. जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये प्रदेशातील हे ४२ वं अवयव दान आहे. सेवारामचं हार्ट, लिवर, लंग्स आणि दोन्ही किडनी दान करण्यात आल्या.

डॉक्टर समरवीर सिंह म्हणाले की, जिल्ह्यासाठी ही फार गर्वाची बाब आहे. १७ वर्षीय मुलगा अपघातात जखमी झाला होता. त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्याची स्थिती गंभीर होती म्हणून त्याला हायर सेंटरला रेफर करण्यात आलं. पण त्याचे नातेवाईक त्याला ग्वालिअरला घेऊन गेले. ग्वालियरमध्ये त्याला एसएमएस हॉस्पिटलमध्ये भरती केली. अखेरचा श्वास घेत त्याने जाता जाता ५ लोकांना नवं जीवन दिलं. 
 

Web Title: 17 year old boy brain dead in Dholpur Rajasthan, Family donate his organ to 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.