१४० अंगणवाड्यांचे लवकरच बांधकाम

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

140 Anganwadis soon construction | १४० अंगणवाड्यांचे लवकरच बांधकाम

१४० अंगणवाड्यांचे लवकरच बांधकाम

>नागपूर : जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शासनाकडून निधी प्राप्त होणार असल्याने १४० अंगणवाड्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
२०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात १४० अंगणवाड्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे. परंतु निधी अभावी ते रखडले आहे. याचा जिल्हा नियोजन समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी शुक्रवारी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 140 Anganwadis soon construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.