१२... भिवापूर... तहसीलदार

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

भिवापूरच्या तहसीलदारांवर कारवाई करा!

12 ... Bhivapura ... Tehsildar | १२... भिवापूर... तहसीलदार

१२... भिवापूर... तहसीलदार

वापूरच्या तहसीलदारांवर कारवाई करा!
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : कार्यप्रणालीमुळे नागरिक त्रस्त
भिवापूर : स्थानिक तहसीलदार शीतलकुमार यादव यांच्या कार्यप्रणालीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
यादव यांची भिवापूर तहसील कार्यालयातील कार्यप्रणाली एकूणच वादग्रस्त ठरत आहे. दरम्यान, भूखंडप्रकरणात अविनाश खडके यांनी तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये आात्मदहनाचा प्रयत्न केला. तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून करण्यात येणारी अवैध वसुली, ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्र तयार करण्याची रखडलेली प्रक्रिया, शिधापत्रिकाधारकांच्या विविध समस्या, तालुक्यात सुरू असलेले गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक यासह अन्य काही प्रकार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. त्यात मारुती कृषी उद्योग कंपनीच्या भूखंडप्रकरणाने भर टाकली.
यासंदर्भात अविनाश खडके यांचे भाऊ जयंत खडके यांनी सांगितले की, भूखंड पाडण्यात आलेली जमीन ही कंपनीच्या मालकीची असून, यातील काही जमिनीची कंपनी व्यवस्थापनाने पूर्वी विक्री करून दिली आहे. त्यानंतर काही वर्षांनी या जमिनीचा नव्याने फेरफार करण्याचा खटाटोप करण्यात आला. कंपनीचे सीएमडी रामचंद्र कुकडे व अविनाश खडके यांनी महिनाभरापूर्वी हा फेरफार बेदायदेशीर असल्याची तहसीलदार यादव यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची साधी चौकशीही करण्यात आली नाही. याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यासाठी जमिनीच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. वारंवार मागणी करूनही ती कागदपत्रे दिली जात नाही. आधी या जमिनीवरील महसूल भरा, अन्यथा कारवाई करू अशी बतावणी केली जाते. थकीत वायद्यासाठी कागदपत्रे अडविण्याचा नियम नाही. या संदर्भात आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे खडके यांनी सांगितले.
तहसीलदारांच्या कार्यप्रणालीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी आपण काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मध्येच आत्मदहनाच्या प्रयत्नाची बातमी भ्रमणध्वनीवरून कळल्याने अधिक चर्चा होऊ शकली नाही. आपण तहसीलदार यादव यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आनंद गुप्ता यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 12 ... Bhivapura ... Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.