ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:06 PM2019-07-14T16:06:39+5:302019-07-14T16:09:00+5:30

कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत.

107 MLAs in Bengal are keen to enter BJP; Didi push them? bjp leader mukul roy says | ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

Next

मुंबई - भाजपा नेता मुकूल रॉय यांनी काँग्रेस आणि माकपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल 107 आमदारभाजपात येण्यास इच्छुक असल्याचेही रॉय यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे रॉय यांनी एक फाईल दाखवून यामध्ये त्या सर्व आमदारांचे आणि पक्षाचे नाव असल्याचेही ते म्हणाले. 

कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांतील फोडाफोडी सुरू असतानाच भाजपचे आता पश्चिम बंगाल ‘लक्ष्य’ असल्याचे संकेत मिळत आहेत. तृणमूल, सीपीएम आणि काँग्रेसचे मिळून 107 आमदार लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी केला. असे झाल्यास विरोधकांच्या गोटातील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल. तसेच ममतांच्या तृणमूल सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
कोलकाता येथील भाजपाच्या नवीन कार्यालयात मुकूल रॉय यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. मात्र, या आमदारांच्या नावांची यादी जाहीर करण्यास आणि माध्यमांना देण्यास नकार दिला. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून हे आमदार भाजपाचे सदस्यत्व स्विकारण्यास सुरुवात करतील, असेही रॉय यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही भाजपाकडून अशाप्रकारे विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाजपा प्रवेशाचे दावे करण्यात आले आहेत. मात्र, भाजपाने घोषित केलेल्या संख्याइतक्या आमदारांनी किंवा नेत्यांनी भाजपात प्रवेश केला नाही. त्यामुळे मुकूल रॉय यांचा दावा किती खरा आणि किती खोटा हे ऑगस्ट महिन्यातच समजेल.

 

पश्चिम बंगाल विधानसभेतील सध्याचे पक्ष बलाबल 
तृणमूल 211
काँग्रेस 44
माकपा 26
भाजप 03
अन्य 10
 

Web Title: 107 MLAs in Bengal are keen to enter BJP; Didi push them? bjp leader mukul roy says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.