आता 100 पेड किंवा मोफत टीव्ही चॅनल्ससाठी मोजावे लागणार प्रतिमहिना 153 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 01:35 PM2019-01-14T13:35:41+5:302019-01-31T12:59:38+5:30

टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे.

100 pay or free tv channels for rupee 153 per month from 1 february | आता 100 पेड किंवा मोफत टीव्ही चॅनल्ससाठी मोजावे लागणार प्रतिमहिना 153 रुपये

आता 100 पेड किंवा मोफत टीव्ही चॅनल्ससाठी मोजावे लागणार प्रतिमहिना 153 रुपये

googlenewsNext

नवी दिल्ली- टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)च्या आदेशामुळे आता प्रेक्षकांना 153 रुपये(जीएसटी सहित) प्रति महिन्याला खर्च करून 100 पेड चॅनल्स आणि इतर मोफत चॅनल्स पाहता येणार आहेत. TRAIनं ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितलं असून, नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याची माहिती दिली जातेय. TRAIनं जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. TRAIच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एखादा HD चॅनल्स हा दोन SD चॅनल्सच्या किमतीच्या बरोबरीचा असेल. 

या नंबरवर करा कॉल
ग्राहक 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करून किंवा advbcs-2@trai.gov.in या arvind@gove.in या ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. 

चॅनल्ससाठी मोजावे लागणार 0-19 रुपये 
दुसरीकडे TRAIने सर्व केबल आणि DTH ऑपरेटर्सना 1 फेब्रुवारीपासून नवी सिस्टीम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनल्स पाहायचे आहेत, त्या चॅनल्ससाठीच फक्त पैसे मोजावे लागणार आहेत. एका चॅनल्ससाठी 0 ते जास्तीत जास्त 19 रुपये मोजावे लागणार आहेत. चॅनल्स वेगवेगळ्या स्वरूपातही आपण निवडू शकता. नवी यंत्रणा सुरुवातीला 29 डिसेंबर 2018 रोजी लागू होणार होती. परंतु त्यांनी डेडलाइन वाढवून 1 फेब्रुवारी 2019 करण्यात आली आहे. 

समजून घ्या गणित 

  • केबल ऑपरेटर सरासरी 200 रुपये आकारतात. यामध्ये ते 350 टीव्ही चॅनेल्स दाखविण्याचा दावा करतात. मात्र, यापैकी आपल्या घरामध्ये 10 ते 15 चॅनेलच पाहिले जातात. तसेच डीटीएच ऑपरेटरचे आहे. त्यांनी ठरवलेले पॅकेज असे असते की त्यामध्ये पसंतीचे सर्व चॅनेल मिळत नाहीत. यामुळे त्या चॅनलसाठी नवीन अॅड ऑन चॅनल किंवा पॅक घ्यावे लागते. हा अतिरिक्त खर्च आता बंद होणार आहे. 
  • नव्या नियमांनुसार केबल किंवा डीटीएच पुरवठादारांकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल निवडता येणार आहेत. सध्या एखादा स्पोर्टचा चॅनेल घ्यायचा झाल्यास महिन्याला 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मात्र, हाच चॅनेल 1 ते 19 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे यापुढे कंपन्या सांगतिल ते चॅनेल नाहीत, तर आपल्याला हवेत तेच चॅनेल घेता येणार आहेत. म्हणजेच ग्राहक राजा असणार आहे. 
     
  • ट्रायने चॅनेलची लिस्ट किंमतीसह दिली...

https://www.trai.gov.in/sites/default/files/PayChannels18122018_0.pdf या लिंकवर तुम्ही चॅनेलचे 2017 चे दर पाहू शकता. 

बेस पॅकची किंमत 

यामध्ये दूरदर्शनचे 27 फ्री-टू एअर चॅनल असणार आहे. शिवाय अन्य श्रेणींमधील प्रत्येकी 5 चॅनल असतील. 130 रुपयांमध्ये 100 चॅनल आणि त्यावर 18 टक्के जीएसटी जमा केल्यास 154 रुपये मोजावे लागतील. या चॅनलमध्ये कदाचित तुम्हाला हवे असलेले मराठी, हिंदी, इंग्रजी सिनेमा, बातम्या, मालिकांचे चॅनेलही असतील. नसल्यास 1 रुपये ते 19 रुपये मोजून ते चॅनल अॅड करावे लागतील. किंवा एखाद्या चॅनेल कंपनीचे पॅकेज हवे असल्यास तेही कमी किंमतीत घेता येईल.

आता आणि नंतरचे शुल्क
कार्टून चॅनल पोगो पाहण्यासाठी सध्या 25 ते 30 रुपये महिना मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 4.25 रुपये असतील. 
स्टार स्पोर्ट चॅनलसाठी 60 ते 75 रुपये मोजावे लागतात. नवीन टेरिफमध्ये 19 रुपये मोजावे लागतील. 

29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार? 

एचडी पाहणाऱ्यांसाठीही आहे खास
एचडी चॅनेल पाहणाऱ्यांनाही हा निर्णय फायद्याचा आहे. एचडी चॅनेलचे पॅकेज 175 ते 200 रुपये आहे. मात्र, एचडी सोबत तेच चॅनेल साध्या व्हर्जनमध्येही दिसतात. यामुळे एचडी वापरणाऱ्यांना विनाकारण साध्या चॅनलचेही पैसे आकारले जातात. सहाजिकच आहे, एचडी पॅकेज घेणारे एचडी चॅनेलच पाहणार. त्यामुळे हा अतिरिक्त भारही कमी होणार आहे. 

Web Title: 100 pay or free tv channels for rupee 153 per month from 1 february

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.