कार अन् ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटंबातील 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:37 AM2021-06-16T11:37:45+5:302021-06-16T11:37:51+5:30

आनंद जिल्ह्यातील तारापूरच्या इंद्रनज गावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. समोरील कारमधून एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते

10 members of the same family killed in car-truck collision in gujrat anandnagar | कार अन् ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटंबातील 10 जणांचा मृत्यू

कार अन् ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटंबातील 10 जणांचा मृत्यू

Next

आनंद - गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील तारापूरजवळ भीषण अपघाताची दुर्घटना घडली. बुधवारी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. वेगात येणाऱ्या ट्रकची कारची समोरासमोर धडक बसल्याने सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील हे सर्वजण होते, त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.   

आनंद जिल्ह्यातील तारापूरच्या इंद्रनज गावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. समोरील कारमधून एकाच कुटुंबातील लोक प्रवास करत होते. या भीषण अपघातात संपूर्ण कुटंबच मृत्युमुखी पडले आहे. मृतांमध्ये 2 महिला, 7 पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सूरतकडून भावनगरला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली.  

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच, 108 अॅम्ब्युलन्स आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तत्पूर्वीच अपघातात कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला होता, या अपघातात कारचा जागीच चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: 10 members of the same family killed in car-truck collision in gujrat anandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.