बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 01:37 AM2019-11-21T01:37:14+5:302019-11-21T01:37:37+5:30

दुसऱ्या टप्प्यात विलीनीकरण; सरकार देणार ६९ हजार कोटींचे पॅकेज

0 thousand applications for BSNL, MTNL VRS | बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज

बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीतील ७७ हजार व एमटीएनएलमधील १३ हजार ५00 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. एमटीएनएलमधील १३ हजार ३00 कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीस पात्र असून, सुमारे १५ हजार कर्मचारी या योजनेखाली अर्ज करतील, असा कंपनीचा अंदाज आहे.

बीएसएनएल व एमटीएनएल या दोन्ही सरकारी दूरसंचार कंपन्या आर्थिकदृषट्या अडचणीत असून, त्यांच्या विलिनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे. हे विलिनीकरण झाल्यानंतर नव्या कंपनीस ६९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार असल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. मात्र या कंपन्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठराव्यात, यासाठी कर्मचारी कपात करण्यात यावी, अशी अट केंद्र सरकारने घातली होती.

त्यानंतर बीएसएनएल व एमटीएनएलने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. बीएसएनएलमध्ये एकूण १ लाख ७४ हजार तर एमटीएनएलमध्ये २५ हजार कर्मचारी काम करतात. बीएसएनएलमधील ७७ हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवत्तीसाठी अर्ज केले असून, आणखी पाच ते दहा हजार तसे अर्ज करतील, असा अंदाज आहे.

४0 हजार कोटींचे कर्ज
या दोन्ही कंपन्यांवर मिळून ४0 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी निम्मे कर्ज तुलनेने लहान असलेल्या आणि दिल्ली व मुंबईतच सेवा देणाºया एमटीएनएलवर आहे. कर्मचारी कपातीमुळे दोन्ही कंपन्यांचा खर्च खूपच कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यामुळे ३१ जानेवारी, २0२0 पर्यंत वयाची पन्नाशी गाठलेल्या वा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाºयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे.

Web Title: 0 thousand applications for BSNL, MTNL VRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.