जि.प. सदस्याने स्वखर्चाने साचलेले पाणी काढण्यासाठी केला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:04 AM2021-11-09T00:04:22+5:302021-11-09T00:04:50+5:30

लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याला वाट काढून मार्ग मोकळा केला.

Z.P. The member made a drain to draw stagnant water at his own expense | जि.प. सदस्याने स्वखर्चाने साचलेले पाणी काढण्यासाठी केला नाला

जि.प. सदस्याने स्वखर्चाने साचलेले पाणी काढण्यासाठी केला नाला

Next
ठळक मुद्देया संदर्भात जगताप यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता

लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याला वाट काढून मार्ग मोकळा केला.

या संदर्भात जगताप यांनी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता. पाणी सारखे वाहत असल्याने लहान मुले, महिला, टू व्हीलर, बाजार समितीकडे येणारे ट्रॅक्टर्स व सर्वच गाड्यांना रहदारीसाठी त्रास होत असल्यामुळे जगताप यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने नाली करून पाणी काढून टाकून खडीकरण करून रस्त्याचे काम करून दिले.
दरम्यान, पुलाखालच्या रस्त्याचे काम कायमस्वरूपात करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले. त्यावेळी कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, सादिक शेख, विश्वनाथ सोमवंशी, गोविंद गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, भाऊसाहेब पवार, केशव पवार आदी उपस्थित होते. 

Web Title: Z.P. The member made a drain to draw stagnant water at his own expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.