लासलगाव येथील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:49 PM2021-01-13T18:49:28+5:302021-01-13T18:51:42+5:30

लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

A youth from Lasalgaon fell from a train and died | लासलगाव येथील युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

संकेत सोनवणे

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लासलगाव : पाण्याची बाटली भरण्यासाठी पाचोरा (जि. जळगाव) येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

लासलगाव येथील संकेत सोनवणे हा युवक भरतीसाठी गेलेला होता. झेलम एक्सप्रेसने गावी परतत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर गाडी थांबली. यामुळे तो पिण्याच्या पाण्याची बाटली भरण्यासाठी खाली उतरला. बाटली भरण्यास वेळ झाल्याने एक्सप्रेस मार्गस्थ झाली. यामुळे घाई गडबळीत धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय सरकला आणि तो डब्याखाली आला. त्याचा उजवा पाय कापला गेला.
पाचोरा येथील रेल्वे पोलीस दिनेश पाटील यांनी त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटल्याने त्याच्या नातलगांना खबर देण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: A youth from Lasalgaon fell from a train and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.