डम्परच्या धडकेत तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 01:20 AM2021-06-18T01:20:33+5:302021-06-18T01:21:23+5:30

संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. 

The young man was killed on the spot by a dumper | डम्परच्या धडकेत तरुण जागीच ठार

डम्परच्या धडकेत तरुण जागीच ठार

Next

नाशिक : संत सावता माळी कॅनॉल रोड व रविशंकर मार्गाच्या टी-पॉईंट चौफुलीवर राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार वैभव पवार (२५,रा. मूळ औरंगाबाद) याचा जागीच मृत्यू झाला. 
वडाळागाव मार्गे नाशिक रोडकडे जात असताना रविशंकर मार्गावरून कॅनॉल रोड चौफुली ओलांडताना राखेची वाहतूक करणाऱ्या डम्परने (एमएच ४६ बीएफ ९६४६) पवारच्या दुचाकीला (एमएच ०५ सीएस ५१७२) जोरदार धडक दिली. यावेळी पवार डम्परच्या मागील चाकाखाली सापडल्याने जागीच चिरडला गेला. यामुळे त्याच्या डोक्यावरून पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डम्पर चालकाने त्याचे वाहन घटनास्थळी सोडून पलायन केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळी बघ्यांची जमलेली गर्दी पोलिसांनी पांगविली. तत्काळ पवारचा मृतदेह पोलिसांनी झाकून शववाहिकेला घटनास्थळी पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: The young man was killed on the spot by a dumper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.