येवल्यात ३६ पॉझिटिव्ह, चौघा बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:00 PM2021-05-11T23:00:25+5:302021-05-12T00:39:01+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ३६ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि.११) पॉझिटिव्ह आले आहेत तर चौघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Next
ठळक मुद्देसद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या २२२ इतकी
येवला : शहरासह तालुक्यातील ३६ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि.११) पॉझिटिव्ह आले आहेत तर चौघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ३६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील ३५ बाधितांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत १९४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४,५७५ झाली असून, यापैकी ४,१७५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्णसंख्या २२२ इतकी आहे.