फेसबुकवर ‘व्होटिंग सेल्फी’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:39 AM2019-04-30T01:39:45+5:302019-04-30T01:40:11+5:30

नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करीत नेटिझन्सने मतदानाचा हक्क मोठ्या अभिमानाने ...

 'Woting Selfie' rain on Facebook | फेसबुकवर ‘व्होटिंग सेल्फी’चा पाऊस

फेसबुकवर ‘व्होटिंग सेल्फी’चा पाऊस

Next

नाशिक : मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर बोटाला शाई लावलेला सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करीत नेटिझन्सने मतदानाचा हक्क मोठ्या अभिमानाने मिरविला. मतदान केंद्राबाहेर काढलेला सेल्फी आपापल्या ग्रुपवर शेअर करण्याबरोबरच अनेकांनी बोटाला शाई लागल्याचे छायाचित्र डीपीदेखील ठेवले. लोकशाहीचा हक्क आणि सामाजिक कर्तव्याचे भान राखत काढलेल्या सेल्फीमुळे सोशल मीडियावर अशा छायाचित्रांचा अक्षरश: पाऊस पडला.
लोकशाही निवडणूक प्रचाराचा अपेक्षित ज्वर दिसला नसला तरी मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी सकाळी मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांनी मतदानानंतर सेल्फी काढत सर्वात अगोदर मतदानाचा हक्क बजावल्याचे सेल्फी आपल्या आप्तस्वकीयांना पाठविले. सोशल मीडियावर अशा प्रकारचे छायाचित्र अपलोड झाल्यानंतर एकेक करीत असंख्य छायाचित्रांचा पाऊस सोशल मीडियावर पडला. बोटाला शाई लावल्याचे छायाचित्र दाखवित ‘मी मतनाचा हक्क बजावला, आपणही बजवा’ असे संदेशही अनेकांनी पाठविले. ‘इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा, असे (शाई लावलेले) बोट दाखविणे केव्हाही चांगले’, ‘बोटं मोडू नका, बोटं दाखवा’ अशा प्रकारचे प्रबोधनपर संदेश आपल्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर टाकण्यात आले होते.
कुणी वैयक्तिक तर कुणी ग्रुपमध्ये सेल्फी काढून आपापल्या मित्रांना मतदानाचे छायाचित्र शेअर केले, तर असंख्य जोडप्यांनी जोडीने सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. मतदान केंद्राबाहेर, पोलिंग बूथ तसेच मतदान केंद्रावरील रस्त्यावर सेल्फी काढत लोकशाही उत्सवाचे नाशिककर साक्षीदार झाले. केवळ सेल्फीचा आनंद न घेता मतदान करण्याचे साकडेही एकमेकांना घालण्यात आले. केवळ नाशिक शहरात हा सेल्फी उत्सव सुरू होता असे नाही तर इतर शहरात असलेल्या अनेकांनी त्यांचे तेथील मतदानाचे सेल्फी शेअर केले.
व्हॉट्स अ‍ॅप डीपी आणि मतदान
मतदानानंतर बोटाला शाई लावलेले छायाचित्राचे सेल्फी ठेवून लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असल्याचे दाखवून दिले. व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलसह अनेकांचे स्टेटसही आज निवडणुकीशी संबंधित होते. एकमेकांच्या वेटिंग सेल्फीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात करण्यात आले. प्रथम मतदान करणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाला सोशल मीडियाची चांगलीच साथ लाभली. प्रथम मत देणाऱ्यांनी आपले फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अपलोड केले.

Web Title:  'Woting Selfie' rain on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.