कवडीमोल दराने द्राक्षउत्पादक चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:12 PM2020-02-28T14:12:48+5:302020-02-28T14:13:06+5:30

सायखेडा : अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या द्राक्ष यंदा भरघोस उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची अखेर फोल ठरली असून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे अवघी तीस ते पस्तीस रु पये किलो दराने विक्र ी होत आहे.

 Worrying at grapefruit prices at an alarming rate | कवडीमोल दराने द्राक्षउत्पादक चिंंतीत

कवडीमोल दराने द्राक्षउत्पादक चिंंतीत

Next

सायखेडा : अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या द्राक्ष यंदा भरघोस उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची अखेर फोल ठरली असून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे अवघी तीस ते पस्तीस रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. द्राक्षे पिकविण्यासाठी लाखो रु पये खर्च केले असले तरी आजच्या भावाने खर्च सुद्दा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
निर्यातक्षम द्राक्ष सत्तर ते पंच्यात्तर रु पये किलो दराने खरेदी होत असली तरी व्यापारी या मालाची हार्वेस्टनीग करून एकरी अवघा तीस ते चाळीस क्विंटल घेऊन जात आहे आणि शिल्लक माल अवघ्या पंचवीस रु पये किलो दराने खरेदी केला जात असल्याने अवकाळी पावसात टिकवलेली द्राक्ष तोट्यात जात आहे . नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असणारे नगदी पीक म्हणून द्राक्षे पिकाकडे पाहिले जाते. युरोपिय राष्टÑ आणि इतर देशांत नाशिकची द्राक्षे निर्यात होत असतात. चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान, पिंपळगाव, ओझर, दिंडोरी, उगाव याठिकाणी उपलब्ध असलेली त्रास ट्रान्सपोर्ट व्यवस्था, निर्यातक्षम द्राक्षसाठी कोल्ड स्टोरेज यामुळे द्राक्षे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष बागायतदार शेतकरी मात्र मागील काही वर्षांपासून कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांनी त्रस्त झाले आहे. कधी उत्पादन चांगले निघते मात्र भाव मिळत नाही तर कधी भाव चांगले असले की विविध रोग आणि धुके पाऊस यामुळे भरघोस उत्पादन निघत नाही. कधी दोन्ही गोष्टी अनुकूल असल्यास व्यापारी माल घेऊन पलायन करतो अशा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

Web Title:  Worrying at grapefruit prices at an alarming rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक