ज्ञानवृद्धीचे काम सामाजिकदृष्ट्या मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:04 AM2020-01-10T00:04:03+5:302020-01-10T00:04:26+5:30

वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचनालयाकडे असलेली ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत नीट पोहोचावी यासाठी पुस्तके ठेवण्याची अत्याधुनिक व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी कंपनीकडून वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे प्रतिपादन माळेगाव येथील जिंदाल सिमलेस अ‍ॅण्ड बिझनेस सॉ लि. कंपनीचे प्रेसिडेंट दिनेशचंद्र सिन्हा यांनी केले.

The work of enlightenment is socially valuable | ज्ञानवृद्धीचे काम सामाजिकदृष्ट्या मोलाचे

सिन्नर वाचनालयास अडीच लाख रुपयांच्या देणगीप्रसंगी दिनेशचंद्र सिन्हा यांचा सन्मान करताना कृष्णाजी भगत. समवेत हेमंत वाजे, पुंजाभाऊ सांगळे, सागर गुजर, निर्मल खिंवसरा, शशी सिन्हा, राजाभाऊ वाजे, राजेंद्र कहांडळ आदी.

Next
ठळक मुद्देदिनेशचंद्र सिन्हा : सिन्नर वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी

सिन्नर : वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचनालयाकडे असलेली ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत नीट पोहोचावी यासाठी पुस्तके ठेवण्याची अत्याधुनिक व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी कंपनीकडून वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे प्रतिपादन माळेगाव येथील जिंदाल सिमलेस अ‍ॅण्ड बिझनेस सॉ लि. कंपनीचे प्रेसिडेंट दिनेशचंद्र सिन्हा यांनी केले.
सिन्हा यांनी वाचनालयातील विविध विभागांची पाहणी करून नानाविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेवरून आपण देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ वाजे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य व संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनीही आधुनिकतेचा अंगीकार करून वाचकांची सेवा करण्यासाठी वाचनालय कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. भगत यांच्या हस्ते सिन्हा यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीचे एच. आर. विभागाचे प्रमुख, शशी सिन्हा व पर्चेस आॅफिसर राजेंद्र कहांडळ यांचाही सत्कार करण्यात आला. विलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चंद्रशेखर कोरडे, राजेंद्र देशपांडे, मनीष गुजराथी, जितेंद्र जगताप, निर्मल खिंवसरा आदी उपस्थित होते.
इंटरनेटमुळे जग जवळ आले असून, पुस्तके वाचण्यापेक्षा नवी पिढी ई-पुस्तके वाचण्यास पसंती देत आहे. वाचनालयाने त्यादृष्टीने वाचकांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सिन्हा यांनी केले. त्यादृष्टीने आगामी काळात पावले टाकणार असल्याचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले.

Web Title: The work of enlightenment is socially valuable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.