मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:39 PM2020-05-22T20:39:05+5:302020-05-22T20:39:23+5:30

सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल,मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे.

Work for 75,000 workers through MGNREGA | मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

googlenewsNext

नाशिक : कोरोनामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली असली तरी फिजिकल डिस्टन्सह अन्य नियमांचे पालन करीत सुरु करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामावर विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ७५ हजार ९९७ मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मनरेगा अंतर्गत शेल्फवर ९८ हजार ८५१ कामे ठेवण्यात आली असून 1 लाखापेखा अधीक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण ५०७७ पैकी २६०३ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात १०३१०, धुळे ११०८०, जळगाव ५४४१, नाशिक २०३४४ आणि नंदुरबार जिल्ह्यात २८८०० मजूर कामावर आहेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. विभागीय आयुक्त राजारामा माने उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधीक कामे हाती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल,मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटीका, फळबाग लागवड, वनीकरण अशी विविध कामे या योजनेअंतर्गत घेतली जात असल्याने गावालादेखील याचा फायदा होत आहे. विशेषत: अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून गावाला याचा उपयोग होणार आहे. सुरू झालेल्या कामांमध्ये वैयक्तिक स्वरुपाची ११९७४ कामे सुरू असून ४९ हजारावर मजूर कामावर आहेत. तर सार्वजनिक स्वरुपाची ११७७ कामे सुरू असून तेथे सुमारे २७ हजार मजूर कामावर आहेत.

Web Title: Work for 75,000 workers through MGNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.