Women's Welfare Association in various fields on behalf of Vision Academy | व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने  विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव
व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने  विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

नाशिकरोड : जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व्हिजन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. अंकिता मुदलियार, मंदाकिनी मुदलियार, कीर्ती मुदलियार, वंदना चाळीसगावकर, शेफाली भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली.  यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्र-राजश्री गांगुर्डे, योगा-शुभांगी रत्नपारखी, समाजसेविका-श्यामला चव्हाण, प्रगतीशील शेतकरी- रूक्मिणीबाई आढाव, वैद्यकीय-डॉ. उमा मोदगी, कायदेतज्ञ-अ‍ॅड. अंजली पाटील, पोलीस प्रशासन- अंजू कुमार, उद्योग - मनीषा धात्रक, राजकीय- कविता कर्डक, भरतनाट्यम- सोनाली करंदीकर, शास्त्रीय गायन- सुमित्रा सोनवणे, सौंदर्य क्षेत्र- शिल्पी अवस्थी यांना व्हिजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  यावेळी आयोजित फॅशन शो सुंदर केशभूषा, सुंदर हास्य
आदी स्पर्धेतील विजेत्या  महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  प्रास्ताविक अ‍ॅड. अंकिता मुदलियार यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली भट्टड व आभार मुख्याध्यापक सुनीता थॉमस यांनी मानले.

ग्लोबल व्हिजन स्कूलमध्ये ‘मावशी नव्हे आईच’ नाटिका
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मावशी नव्हे आईच’ या कार्यक्रमात शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक पंडित शंकरराव वैरागकर उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत राजानी दाम्पत्यासह एस. एम. फाउंडेशनचे सचिव शशांक मणेरीकर, संचालक विजयालक्ष्मी मणेरीकर, संतसेवा संघाचे प्रमुख दिलीप दीक्षित आदी उपस्थित होते. यावेळी मनीषा पिंगट यांच्यासह श्रेया गायखे, प्रथमा भरवीरकर, भाग्यश्री देवरे, रुद्रा कदम, ऋषभ रॉय, व्यंकटेश खैरनार, श्रेया खाजोळे, साई देशमुख, यश ठाकरे,अनुष्का गावले, उन्नती खैरनार, समृद्धी महाजन, अंश सोमवंशी, गिरिजा जाधव, अक्षदा काळे, स्नेहल काळे, आयुश बोरसे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुनीता त्रिवेदी यांनी केले.
वैभव पतसंस्था
वैभव पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पळसे ग्रामपालिका सफाई कर्मचारी महिलांचा नासाका अध्यक्ष तानाजी गायधनी, संस्था अध्यक्ष श्यामराव गायधनी यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विष्णु गायधनी, बाळासाहेब गायधनी, रामकृष्ण गायखे, बबनराव थेटे, निवृत्ती गायधनी, नामदेव गायधनी आदी उपस्थित होते.

अग्रवाल महिला मंडळातर्फे सत्कार
अग्रवाल सभेअंतर्गत कार्यरत अग्रवाल महिला मंडळातर्फे प्रा. डॉ. सोनाली पाटील (समाजसेवा) किलबिल स्कूलच्या प्राचार्य श्रीमती फ्लोरा (शैक्षणिक), ज्योती वाकचौरे (पोलीस सेवा), दुर्गा जोंधळे (एसटी वाहतूक नियंत्रक), शोभा शुक्ला (बसवाहक), नीकिता (मेकॅनिक), भाग्यश्री शिवदे (शालेय वाहनचालक), ताराबाई (घरेलू कामगार), मंजुळा पोद्दार (मंडळ संस्थापक) यांचा महिला दिनानिमित्त निर्माण हाउस येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशी अग्रवाल होत्या. यावेळी सपना अग्रवाल, वीणा गर्ग, अरुणा अग्रवाल, संजू मित्तल, संगीता अग्रवाल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलम अग्रवाल यांनी, तर सन्मानार्थींचा परिचय नीरा अग्रवाल यांनी करून दिला.

Web Title:  Women's Welfare Association in various fields on behalf of Vision Academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.