The woman arrested for allegedly firing a pistol at a woman | महिलेला पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या परप्रांतीयास अटक

महिलेला पिस्तुलाचा धाक दाखविणाऱ्या परप्रांतीयास अटक

ठळक मुद्देमहिलेच्या डोक्याला पिस्तुल लावले आणि गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी

घोटी : एका महिलेच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून जीवे ठार मारण्याची धमकी देणाºया परप्रांतीय व्यक्तीस घोटी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सदर इसमाकडून पिस्तुलही जप्त केले आहे.
याबाबत संबंधित महिलेने घोटी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, घोटी येथील रामराव नगर येथे राहणा-या व मजुरीकाम करणाºया एका महिलेला संशयित आरोपी सईराम हरिकनराम विष्णोई (वय ३३, रा. डोली, ता. पचपुतराय, जि. बाडमेर, राजस्थान) याने सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास भेटण्याचा बहाणा केला. त्यानुसार त्याने रामराव नगर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळ महिलेला बोलावले. सदर महिला गेली असता त्याने आपल्याबरोबर येत नाही म्हणून महिलेच्या डोक्याला पिस्तुल लावले आणि गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी यांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी सदर विष्णोई यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, गावठी बनावटीचे पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे.

Web Title:  The woman arrested for allegedly firing a pistol at a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.