शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत धुळ्याचा अंपळकर ठरला विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:12 PM2019-03-02T22:12:20+5:302019-03-02T22:15:00+5:30

मालेगाव : मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत केशरी गटात धुळ्याचा सुहास अंपळकर हा विजेता ठरला. मान्यवरांच्याहस्ते त्याला गदा प्रदान करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कुस्तीस्पर्धा घेण्यात आली.

Winner of Dhule in the Shiv Chhatrapati Kushti Championship | शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत धुळ्याचा अंपळकर ठरला विजेता

शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेतील एक लढतीचा क्षण.

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांच्याहस्ते त्याला गदा प्रदान

मालेगाव : मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धेत शिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत केशरी गटात धुळ्याचा सुहास अंपळकर हा विजेता ठरला. मान्यवरांच्याहस्ते त्याला गदा प्रदान करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कुस्तीस्पर्धा घेण्यात आली.
डायमंड मिल परिसरात झालेल्या स्पर्धेत ३२ ते ८६ किलो वजनी गटात तिनशे मल्ल सहभागी झाले होते. केशरी गटात अंतिम लढत सुहास अंपळकर व प्रवीण देशमुख यांच्यात झाली. स्पर्धेत अंपळकर यांनी विजय मिळविला. प्रत्येक वजनी गटातील विजेत्याला मानाची गदा तर द्वितीय विजेत्यांना ढाल प्रदान करण्यात आली.
पहिलवान दीपक पाटील व कपील डांगचे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. पंच म्हणून भरत मायकल यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, उपमहापौर सखाराम घोडके, सुरेश गवळी, शरद पाटील, राजाराम जाधव, धर्मा भामरे, बाबा हिरे, विवेक वारुळे आदि उपस्थित होते.स्पर्धेत वजनी गटातील विजेते असेशिवछत्रपती कुस्ती स्पर्धेत जुनैद मोहंमद (३२ किलो), फैजान शेख (३८ किलो), राहुल परदेशी (४२ किलो), रोहित परदेशी (४६ किलो), रमेश गवळी (५० किलो), प्रमोद ठोके (५७ किलो), तौसीफ शेख (६१ किलो), गोपाल कन्नोर (६५ किलो), दीपक भद्री (६५ किलो), अशोक जाधव (७० किलो), आसिफ शेख (७४ किलो), जॅकी गवळी (७९ किलो), मुकेश चौधरी (८६ किलो).

Web Title: Winner of Dhule in the Shiv Chhatrapati Kushti Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.