वादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 03:29 PM2021-05-17T15:29:46+5:302021-05-17T15:35:59+5:30

तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले.

Wind speed 18 km per hour; Influence of 'Taukte' on the climate of Nashik | वादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव

वादळी वाऱ्याचा वेग १८ किमी प्रतीतास; 'तौक्ते'चा नाशकाच्या हवामानावर प्रभाव

Next
ठळक मुद्देअधुनमधुन हलक्या सरी शहरात केवळ १.६मिमीपर्यंत पाऊस

नाशिक : शहर व परिसरात पहाटेपासूनच सोमवारी (दि.१७) वातावरणावर ह्यतौक्तेह्णचा प्रभाव झाल्याचे दिसुन आले. सकाळी वाऱ्याचा वेग ताशी आठ किलोमीटर इतका होता; मात्र साडेअकरा वाजेपासून वाऱ्याचा वेग ताशी १८ किमी इतका वाढला होता. वाऱ्याचा वेग अधिक वाढल्यामुळे नाशिककरदेखील घराबाहेर पडले नाही. यामुळे शहरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता.

तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. शहराच्या वातावरणात सकाळी आर्द्रता ८१ टक्के इतकी मोजली गेली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात केवळ १.६मिमीपर्यंत पाऊस झाल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. दिवसभर पावसाच्या सरींचा वर्षाव जरी होत नसला तरीदेखील वाऱ्याचा वेग हा सरासरी १८ किमी प्रतीतास इतका होता. दिवसभरात वारे वेगाने वाहू लागल्यामुळे नागरिकांतही भीतीचे वातावरण पसरले होते. अतीउंचीवरील होर्डिंग्जदेखील वाऱ्याच्या वेगाने अक्षरक्ष: जमिनीच्या बाजूने झेपावले होते. तीन ते चार ठिकाणी दुपारपर्यंत झाडे पडल्याचे 'कॉल' अग्नीशमन दलाला प्राप्त झाले होते. ढगाळ हवामान आणि वेगाने वाहणारे वारे दिवसभर कायम होते.
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाणार असल्यामुळे हवामान खात्याकडून नाशिकलादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर नाशकात जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती नियंत्रणासाठी आपत्कालीन कक्ष उभारण्यात आला होता. प्रशासनाकडून मनपा अग्नीशमन दल, जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन टीमला ॲलर्टवर ठेवण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत वादळी वाऱ्याचा वेग कायम होता.

Web Title: Wind speed 18 km per hour; Influence of 'Taukte' on the climate of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.