रासाकाचा बॉयलर यंदा तरी पेटणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 09:53 PM2020-03-04T21:53:51+5:302020-03-04T21:56:20+5:30

काकासाहेबनगर : कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्यामागचे गेली काही वर्षे सुरू असलेले शुक्लकाष्ठ काही संपत नसल्याने दोन वर्षांपासून बंद असलेला रासाकाचा बॉयलर कधी पेटणार? हा सवाल अनुत्तरित आहे. लालफितीच्या कासवगतीने सुरू असलेल्या कारभारामुळे कामगार व ऊस उत्पादकांना मागील दोन वर्षाप्रमाणे चालू गळीत हंगाम बंद राहतो की काय? अशी भीती रानवड परिसरात निर्माण झाली आहे.

Will Rasaka's boiler burn this year? | रासाकाचा बॉयलर यंदा तरी पेटणार का?

रासाकाचा बॉयलर यंदा तरी पेटणार का?

Next
ठळक मुद्देतारीख पे तारीख : शुक्लकाष्ट संपता संपेना, गळीत हंगाम सुरू होण्याबाबत साशंकता

लोकमत न्यूज नेटवर्क
काकासाहेबनगर : कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्यामागचे गेली काही वर्षे सुरू असलेले शुक्लकाष्ठ काही संपत नसल्याने दोन वर्षांपासून बंद असलेला रासाकाचा बॉयलर कधी पेटणार? हा सवाल अनुत्तरित
आहे. लालफितीच्या कासवगतीने सुरू असलेल्या कारभारामुळे कामगार व ऊस उत्पादकांना मागील दोन वर्षाप्रमाणे चालू गळीत हंगाम
बंद राहतो की काय? अशी भीती रानवड परिसरात निर्माण झाली आहे.
मार्च महिना उजाडला तरी साखर आयुक्तांनी रासाकाची भाडेपट्टा निविदा अजून काढली नसून २१ नोव्हेंबर २०१९ रोजी दहा दिवसांची निविदा काढण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी महाराष्ट्रात जाहिरात दिली गेली.सुरक्षानिविदा उघडण्याची ३ डिसेंबर तारीख होती. नंतर साखर आयुक्त पुणे साखर संघ व प्रादेशिक साखर अहमदनगर व रासाका अवसायक विभागाच्या कारभारामुळे सदर निविदा निघू शकल्या नाही व नंतर आचारसंहिताचा बागुलबुवा करीत रासाका टेंडर प्रक्रिया स्थगित करण्यात आली, परंतु मार्च उजाडला तरी रासाकासाठी निविदा भरण्याचे टेंडर कधी निघते व कोणाच्या निविदा आल्या यासाठी कामगार व ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यात तेल घालून बघत आहे, परंतु भाडेपट्टा निविदांबाबत प्रशासनाची भूमिका समजत नसल्याने तालुक्यातील रासाकावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांच्या चिंतेत भर पडली आहे.चालू गळीत हंगाम साखर संघ म्हणा की, शासनाच्या उदासीन धोरणामुळे अजूनही अडखळत आहे, परंतु याचा परिणाम कामगार ऊस उत्पादक शेतकरी व स्थानिक व्यावसायिकांची आर्थिकदृष्ट्या कोंडी होऊन नागरिक कर्जबाजारी झाले आहे.
- एल. जी. वाघ, माजी कार्यकारी संचालक, रासाका
रासाका हा दोन वर्षांपासून बंद झाल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालवली तर चालू गळीत हंगाम सुरू होईल या आशेवर परिसरातील व्यावसायिक होते, परंतु मागील शासनाप्रमाणे या शासनाचाही अनुभव वाईट येत आहे.
- विश्वनाथ जाधव, व्यावसायिक, रासाका कार्यस्थळ.
दिस येतील, दिस जातील, भोग सरलं असं वाटत होतं, परंतु तारीख पे तारीख व लालफितीचा उदासीन कारभार याच्यामुळे रासाका बंद आहे. कोट्यावधी रुपये थकीत आहे म्हणून तालुक्यातील भूमिपुत्र तथा लोकप्रतिनिधी म्हणून शासनाने रासाका आमदार दिलीप बनकर यांच्या ताब्यात दिल्यास रासाकाला अच्छे दिन येतील.
- बळवंतराव जाधव, अध्यक्ष, रासाका कामगार संघटना

Web Title: Will Rasaka's boiler burn this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.