आडगाव परिसरात मनपा लावणार का ‘दिवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:36 PM2019-10-14T22:36:35+5:302019-10-15T00:55:07+5:30

बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठ्या नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र या पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे.

Will 'lights' be set up in Adgaon area? | आडगाव परिसरात मनपा लावणार का ‘दिवे’

आडगाव परिसरात मनपा लावणार का ‘दिवे’

Next
ठळक मुद्देभुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ : पथदीव्यांची प्रतीक्षा; नागरिकांमध्ये नाराजी

आडगाव : बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठ्या नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र या पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे.
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंग रोड) मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय कर्मचारी, महावीर कॉलेज, म्हसरूळ, आडगाव, निसर्ग कॉलेज, आरोग्य विज्ञानपीठाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून, या रस्त्याच्या वापरामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होतो. शिवाय सागर व्हिलेज, श्रीरामनगर, कर्मयोगीनगर, राम गाडीया भवन, के. के. वाघ शाळा, महाविद्यालय, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, भुजबळ कॉलेज होस्टेल, पोलीस वसाहत, एचएएल कर्मचारी वसाहत या मार्गावर आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावर वर्दळ असते. शिवाय सकाळी कामावर जाणाºया स्थानिक नागरिकांची गर्दी असते. या मार्गावर अनेकवेळा सोनसाखळी चोºया, भुरट्या चोºया आणि गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. या रस्त्याच्या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे, परंतु अर्धा मार्ग अंधारात असल्यामुळे रात्रीचे जाणे-येणे बरेच लोक टाळतात. त्यामुळे उर्वरित मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत पोलदेखील उभारण्यात आले. परंतु चार ते पाच महिने उलटूनही त्यावर दिवे बसविले गेले नसल्याने हा परिसर अंधारात आहे.
बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पथदीप बसवावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Will 'lights' be set up in Adgaon area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.