सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:31 PM2021-01-21T20:31:11+5:302021-01-22T00:39:56+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या २८ जानेवारीला निश्चित होणार आहे. नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींपैकी भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर या तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपद नव्या आरक्षणानुसार होणार आहे. त्यामुळे शेणवड खुर्द, भरवीर खुर्द व गरुडेश्वर पंचायतीत सरपंच पदाची लॉटरी कुणाला लागणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Who won the Sarpanch lottery? | सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

googlenewsNext
ठळक मुद्दे इगतपुरी तालुका : ३२ ग्रामपंचायतींचा होणार फैसला

इगतपुरी तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी येत्या २८ जानेवारीला पंचायत समिती सभागृहात बैठक होणार असून, त्यात आरक्षण निश्चित होणार आहे. इगतपुरी तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती असून, ६४ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात आहेत तर, उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. या अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी, ओबीसी, सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आरक्षण निघणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व अन्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरपंच पदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रामपंचायतीत सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, आरक्षणानुसार सरपंचपद कुणाकडे जाणार, याबाबत अंदाज बांधले जात आहे. इगतपुरी तालुक्यात सध्या निवडणुका झालेल्या भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर ग्रामपंचायतीत नव्या आरक्षणानुसार सरपंच निवड होणार असल्याने या तीन पंचायतीत सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे
या ग्रामपंचायतींचे ठरणार आरक्षण
वाडीव-हे., गोंदे दुमाला, माणिकखांब, मुंढेगाव, मुकणे, नांदूरवैद्य, साकूर, सांजेगाव, मुरंबी, भरवीर बु, कुर्हेगाव शेनीत, वाघेरे, मोडाळे, नांदगाव बु., समनेरे, कावनई, भरवीर खुर्द, बेलगाव कुर्हे, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, दौंडत, मालूजे, जानोरी, शिरसाठे, पाडळी, निनावी, पिंपळगाव घाडगा, लक्ष्मीनगर, कृष्णानगर, गरुडेश्वर, शेनवड खुर्द.

Web Title: Who won the Sarpanch lottery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.