...असा माझा कोणता गुन्हा होता?

By संजय वाघ | Published: February 17, 2020 01:53 AM2020-02-17T01:53:55+5:302020-02-17T01:54:24+5:30

नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद्भवतात तेव्हा रक्तनात्याचा क्रम अग्रभागी असतो आणि तो स्वाभाविकही मानला जातो. असे असताना लासलगाव बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी जळीत महिलेच्या निमित्ताने यासंबंधी भ्रमनिरास करणारे चित्र पहावयास मिळाले व त्याचीच चर्चा नागरिकात होत असल्याचे दिसून आले.

What was my crime? | ...असा माझा कोणता गुन्हा होता?

...असा माझा कोणता गुन्हा होता?

Next
ठळक मुद्देपीडितेचा सवाल : लासलगावच्या महिला जळीत प्रकरणात नातेवाईकांची तटस्थता

नाशिक : नात्यांची पहिली ओळख तशी रक्ताच्या नात्यांपासून होते. ती वीण जसजशी वाढत जाते, त्यानुसार अन्य गोतावळ्याची त्यात भर पडत जाते. वयोमानपरत्वे आणि आपल्या वागण्या-बोलण्यानुसारही काही नात्यांची निर्मिती कळत-नकळत होत जाते. तरीदेखील सुख-दु:खाचे प्रसंग जेव्हा उद्भवतात तेव्हा रक्तनात्याचा क्रम अग्रभागी असतो आणि तो स्वाभाविकही मानला जातो. असे असताना लासलगाव बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी जळीत महिलेच्या निमित्ताने यासंबंधी भ्रमनिरास करणारे चित्र पहावयास मिळाले व त्याचीच चर्चा नागरिकात होत असल्याचे दिसून आले.
शनिवारी (दि.१५) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास लासलगाव बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने गजबजले होते. प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असताना त्याच आवारातील एका कोपऱ्यात दुसरे लग्न करण्याच्या कारणावरून एक युवक आणि महिला यांच्यात वाद सुरू होता. कोणाला काही कळण्याच्या आत पेट्रोलचा भडका उडाला आणि संबंधित महिला गंभीररीत्या भाजली. उपस्थितांनी माणुसकीच्या भावनेतून त्या महिलेला विझविले.
तोपर्यंत आगारप्रमुख एस. एम. शेळके यांनी पोलीस व रुग्णवाहिकेला तत्काळ कळवून बोलावूनही घेतले आणि तिची रवानगी तातडीच्या उपचारासाठी लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी पीडितेवर प्राथमिक उपचार केले, मात्र पीडिता ६७ टक्क्याहून अधिक भाजल्याने तिला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्य दोन तरुणांच्या मदतीने पीडितेला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात आणले. या सर्व घटनाक्रमात, अशा प्रसंगात रुग्णाला सर्वाधिक गरज असते ती आपल्या कुटुंबीयांकडून मिळणाºया मानसिक आधाराची. तो त्या पीडितेला घटनेनंतर सहा तास उलटेपर्यंत मिळाला नसल्याचे दिसून आले.
बिकट प्रसंगात नात्यागोत्याच्या नसलेल्या माणसांनी धावूत येत माणुसकीचे दर्शन घडवावे आणि रक्ताच्या नात्याने मात्र आपल्याकडे पाठ फिरवावी, असा आपण कोणता गुन्हा केला होता असाच तर सवाल त्या दुर्दैवी पीडितेला अस्वस्थ करीत नसेल?

वास्तविक एखाद्या दुर्घटनेनंतर संबंधित व्यक्ती गुणी आहे की अवगुणी याचा विचार न करता ती केवळ आपल्या रक्ताची आहे या एकाच मुद्द्यावर कुटुंबातील सदस्य धावाधाव करतात, ती व्यक्ती बरी व्हावी यासाठी नानाविध दवाखान्याचे उंबरे झिजवितात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तिला वाचविण्यासाठी प्रसंगी दुवाही मागतात. हा अनुभव सर्वत्र येत असताना या पीडितेच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबातील एकाही सदस्याने प्रारंभीच्या काळात पुढे येऊ नये हिच बाब जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना खटकत राहिली.

Web Title: What was my crime?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.