मालेगावी बसपाच्या संवादयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:52 PM2021-10-12T22:52:45+5:302021-10-12T22:53:42+5:30

मालेगाव : सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधातील भाजपच्या दुटप्पी भूमिकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मुस्लिम बांधव असुरक्षित वातावरणात जगत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सर्वच पक्षांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. केवळ मतांसाठी त्यांचा सोयीस्कररीत्या वापर करून घेतला जात असल्याचा आरोप बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी केला. मालेगावी बसपाच्या संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.

Welcome to Malegaon BSP's dialogue tour | मालेगावी बसपाच्या संवादयात्रेचे स्वागत

मालेगावी बसपाच्या संवाद यात्रा दरम्यानच्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे समवेत प्रदेश महासचिव शांताराम तायडे, प्रमोद रैना, आनंद आढाव, रमेश निकम, रफिक सिद्धीकी, संतोष शिंदे, लालचंद शिरसाठ आदी.

Next
ठळक मुद्दे केवळ मतांसाठी त्यांचा सोयीस्कररीत्या वापर करून घेतला जात असल्याचा आरोप

मालेगाव : सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधातील भाजपच्या दुटप्पी भूमिकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मुस्लिम बांधव असुरक्षित वातावरणात जगत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सर्वच पक्षांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. केवळ मतांसाठी त्यांचा सोयीस्कररीत्या वापर करून घेतला जात असल्याचा आरोप बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी केला.

मालेगावी बसपाच्या संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या मेळाव्यात ताजने म्हणाले की, बसपाच्या झेंड्याखाली सर्वसमावेशक विकासासाठी मुस्लिम बांधवांच्या मदतीची आवश्यकता आहे. ह्यसर्वजन हिताय,सर्वजन सुखायह्णचे उद्दिष्टापर्यंत पोहोचून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी बसपाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रदेश महासचिव शांताराम तायडे, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश सचिव आनंद आढाव, रमेश निकम, जिल्हा प्रभारी पोलस अहिरे, रफिक सिद्धीकी, जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे, लालचंद शिरसाठ,शहर अध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष दिलीप पाथरे, महासचिव राजू जाधव, संघटक दिलीप गवळी, सुमित पवार, विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहित तेली, नंदू डावरे, योगेश सोनोने, वाल्मीकी समाज कमिटी चंदन ढिलार, अश्विनी अहिरे उपस्थित होते.
 

Web Title: Welcome to Malegaon BSP's dialogue tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.