जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 06:44 PM2019-10-15T18:44:57+5:302019-10-15T18:45:46+5:30

निफाड : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश व सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाण्याचा वापर व त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी राज्यात फिरत असलेल्या जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत करण्यात आले.

Welcome to the bus station at Niphad | जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत

जलदुत बसमधील पोस्टर्स आणि चित्रफीत प्रदर्शनाचे उदघाटन करतांना वंदना खांदवे, सोबत. रविकांत कर्वे, परवेज शेख, रशीद पठाण आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली.

निफाड : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश व सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाण्याचा वापर व त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी राज्यात फिरत असलेल्या जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत करण्यात आले.
संपूर्ण राज्यात ११ शाखा कार्यरत असणाऱ्या या संस्थेने जलसाक्षरता व संवर्धन यासाठी चित्ररथ असलेली जलदुत बस तयार केली असून ही बस संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. निफाड येथे बसस्थानकात ही बस आल्यानंतर या बसमधील पोस्टर्स आणि चित्रफीत विद्यार्थी, शिक्षक व स्थानकावर असलेले प्रवासी यांनी बघितली.
या बसमध्ये पाण्याचा वापर कसा करावा, बचत कशी करावी याबाबत माहिती दिलेली होती. या निमित्ताने निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत वैनतेय विद्यालय व निफाड इंग्लिश स्कुल मधील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
याप्रसंगी जलसाक्षरता टूर सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर, सी. एच. चद्दुके, देवराम गवळी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वंदना खांदवे, सचिन गाडे, सचिन भाटे, लक्ष्मण राठोड, उत्तम गायकर, नामदेव गणाचार्य, रामकृष्ण मांडे, शिवाजी गायकर, पंढरीनाथ भिसे, दुर्गेश गायकर आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी कृष्णाली होळकर, भूषण गडाख, निकिता कर्डीले व चित्रकला स्पर्धातील यशस्वी विद्यार्थी शोमीन शेख, प्रेमसिंग जाधव, शुभांगी गाजरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली.


 

Web Title: Welcome to the bus station at Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.