विधानसभा निवडणुकीच्या  निकालासाठी कडेकोट पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:48 AM2019-10-24T00:48:14+5:302019-10-24T00:49:00+5:30

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी नाशिक शहर व जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने चोख नियोजन करत कडेकोट पहाऱ्यासाठी हजारो पोलिसांसह निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

 Wear a drawer for assembly election results | विधानसभा निवडणुकीच्या  निकालासाठी कडेकोट पहारा

विधानसभा निवडणुकीच्या  निकालासाठी कडेकोट पहारा

Next

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी नाशिक शहर व जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने चोख नियोजन करत कडेकोट पहाऱ्यासाठी हजारो पोलिसांसह निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आले असून, केंद्रांची अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ही सशस्त्र दलाच्या जवानांकडे सोपविण्यात आली आहे.
२१ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर शहरात ५ तर ग्रामीण भागात तालुक्यांच्या ठिकाणी १० मतमोजणी केंद्रे आहेत. मतमोजणीप्रक्रिया पार पडेपर्यंत संरक्षणासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) चार कंपन्यांचे चारशे जवान नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रासाठी शहरात उपआयुक्त व सहायक पोलीस आयुक्त तसेच ग्रामीण भागात उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून कर्तव्यावर राहणार आहे. त्यांना केंद्रीय पथकांसह सरासरी १०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त बंदोबस्त तेथे उपलब्ध करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी हद्दीतील बंदोबस्तावर पोलीस आयुक्त, अधीक्षकांसह सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, राखीव दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, होमगार्ड यांचा मिळून शहरात सुमारे तीन ते चार हजार पोलीस तर जिल्ह्यात सहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेºयांचा ‘वॉच’
सर्व स्ट्रॉँगरूम हे सीसीटीव्ही कॅमेºयांच्या नजरेत आहे. या सर्व ठिकाणी निकालानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच त्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तर मतमोजणी केंद्रापासून निकाल ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना २०० मीटर अंतरावर थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे.
...तर थेट होणार गुन्हे दाखल
४शहरासह जिल्ह्यातील मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रांच्या चारही बाजूंनी २०० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उच्च क्षमतेचे कॅमेरे असलेले मोबाइल फोन वापरू शकणार नाही. तसेच पेन कॅमेरा, मोबाइल फोन, शर्टाच्या बटनसारखा छुपा कॅमेरा, डिजिटल घड्याळ, व्हिडीओ कॅमेरा, वायरलेस सेट यांसारखी तत्सम साधने तसेच ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे मतमोजणी केंद्रांच्या परिसरात आणल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

Web Title:  Wear a drawer for assembly election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.