गिरणा धरणाची वाटचाल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 07:30 PM2019-09-14T19:30:32+5:302019-09-14T19:53:40+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

On the way to Shambhari by the way of the mill | गिरणा धरणाची वाटचाल शंभरीकडे

गिरणा धरणाची वाटचाल शंभरीकडे

googlenewsNext
ठळक मुद्देसाकोरा : अकरा वर्षांनंतर प्रथमच भरणार काठोकाठ

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या धरणात आजच्या साठ्यावर किमान उन्हाळ्यात चार आवर्तने मिळू शकतात. त्यामुळे दोन ते तीन वर्षापासून बारगळलेला रब्बी हंगाम यावर्षी फुलणार आहे. परिणामी या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकऱ्यांमध्ये समाधशनाचे वातावरण पसरले आहे.
गिरणा धरणात गत दोन ते तीन वर्षानंतर यावर्षी शेवटी पुन्हा एकदा चांगला जलसाठा झाल्याने गिरणा पट्यातील मळगाव, नरडाणा, बोराळे, आमोदे आदी नाशिक जिल्ह्यातील गावांबरोबरच जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्यात असणाºया अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबरच जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही शंभर टक्के सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करणाºया गिरणा पट्टा यंदा हिरवाईने नटणार आहे.
चौकट....
रब्बीच्या आशा पल्लवित
गिरणा धरणाची एकूण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आहे. सद्यस्थितीला धरणात एकूण २० हजार ३२८ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. त्यापैकी ३ हजार वगळता १७ हजार ३२८ एवढा उपयुक्त जलसाठा आहे. म्हणजेच ९३ टक्के एवढा पाणीसाठा आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाण्याच्या धीम्या गतीने का होईना आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे.
त्यात धरण क्षेत्रातील धरणही भरल्याने पाणी आल्यावर त्यातून विसर्ग सुरू होतो. धरण यंदा शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. २००८ नंतर पहिल्यांदाच गिरणा धरणाची ही स्थिती होण्याचा अंदाज आहे. दरम्यान धरणात दमदार पाणीसाठा असल्याने धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ही सध्या पाहायला मिळते आहे.
पाणीटंचाई मिटली
गिरणा धरणात आत्तापर्यंत ९३ टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणा पट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. नांदगाव तालुक्यातील मळगाव, बोराळे, आमोदेसह ५६ खेडी नळ योजना, मालेगाव महानगर पालिका तसेच मालेगाव तालुक्यातील नरडाणे, कळवाडी आदी गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दहिवाळ पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल पालिका सह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. यामुळे त्या गावांची पाणीटंचाई वर्षभरासाठी दूर झाली आहे गेल्या वर्षी धरणात ४८ टक्के एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षी पाणी टंचाईची झळ सर्व पट्यात मोठ्या प्रमाणात बसली होती. यंदा मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.
प्रतिक्रि या.....
गिरणा धरणातून अजून पाणी सोडण्यात आले नसून कोणीही अफवा पसरवू नये. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिङीयावर गिरणातून पाणी सोडण्यात आल्याचे जुने फोटो आणि माहिती पाठवली जात आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. आज या धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. संबधित विभागाच्या नियमानुसार या धरणात १५ सप्टेंबर पूर्वी ९६ टक्के पाणीसाठा झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. धरण क्षेत्रात येत्या काही दिवसांत पाणीसाठा वाढल्यास किंवा पाणी सोडण्याची परिस्थीती निर्माण झाल्यास नागरिकांना अधिकृत कळविण्यात येईल.
- एस. आर. पाटील
शाखा अभियंता, गिरणा धरण.
गिरणा धरणात यावर्षी मुबलक पाणी साठा होणार असून धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी किमान तीन ते चार आवर्तने सोडण्यात येतील. त्याचा सर्वाधिक फायदा आम्हा शेतकºयांना मिळणार असून रब्बी हंगामासाठी त्या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.
- नितेंद्र राजपूत
शेतकरी, बोराळे, ता. नांदगाव.

Web Title: On the way to Shambhari by the way of the mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार