हरणबारी उजव्या कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:14 PM2020-08-26T16:14:02+5:302020-08-26T16:14:40+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले.

Water released to Haranbari right canal | हरणबारी उजव्या कालव्याला सोडले पाणी

हरणबारी उजव्या कालव्याचे गेट खोलून पूर पाणी सोडतांना आमदार दिलीप बोरसे समवेत करंजाड येथील शेतकरी अरु ण देवरे, प्रवीण देवरे, तुषार कापडणीस, उपअभियंता अभिजित रौंदळ आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : खरीप पिकाला होणार लाभ

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले.
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ११६६ दशलक्षघनफुट क्षमतेचे आहे. त्याच्यावर उजव्या आणि डाव्या कालव्याबरोबरच तळवाडे भामेर पोहोच कालवा हे तीन प्रकल्प आहेत. उजव्या कालव्यांतर्गत येणाºया अंतापूर, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताणे, पारनेर, बिजोटे या गावांना त्याचा मोठा फायदा आहे. या भागातील पाझर तलाव भरून घेण्यासाठी पूर पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली होती. याची दखल घेत आमदार बोरसे यांनी तत्काळ जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आमदारांच्या हस्ते उजव्या कालव्याचा गेट खोलून पाणी सोडण्यात आले. सुरु वातीला २५ क्युसेक पाणी सोडण्यात आले असुन टप्प्याटप्प्याने त्याच्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उपअभियंता रौंदळ यांनी सांगितले.
याप्रसंगी करंजाडचे शेतकरी अरु ण देवरे, प्रवीण देवरे, संजय देवरे, कैलास देवरे, गौरव देवरे, नरेंद्र देवरे, हेमराज देवरे, गणेश देवरे, तुषार कापडणीस, निलेश देवरे, धनंजय देवरे, योगेश देवरे, सोनू देवरे, कालवा निरीक्षक डी. डी. भदाणे, एन. एन. पवार आदी उपस्थित होते.
हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहोच कालवा आणि केळझर डावा कालवा, चारी क्र मांक आठ या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांची देखील पूर पाण्याची मागणी आहे. या कालव्यांची साफसफाई करून येत्या दोन ते तीन दिवसात पाणी सोडण्याच्या सूचना संबधित अधिकाºयांना देण्यात आलेल्या आहेत.
- आमदार दिलीप बोरसे, बागलाण.

Web Title: Water released to Haranbari right canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.