ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 05:56 PM2019-12-12T17:56:42+5:302019-12-12T17:58:47+5:30

ठाणगाव- तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव येथे युवा मित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.

 Water literacy campaign at Thangaon | ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

ठाणगाव येथे जलसाक्षता अभियान

Next

युवा मित्र संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना गावातील भूजल पातळीत वाढ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.पाणी वापर संस्थेचे महत्त्व, नियोजन व व्यवस्थापन, जबाबदारी तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात भर पाडता येईल याची माहिती लोणारे यांनी ग्रामस्थांना दिली.महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेत युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या जलसमृध्दी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली जलस्त्रोतांमधील गाळ काढण्याची प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये युवा मित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउंडेशनमार्फत पोकलेन मशीन, महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल. तसेच लोकसहभागातून बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक करण्यात येणार आहे. गावातील पाणी वापर व नियोजन याबाबतचा विकास आराखडा उपस्थित ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच नामदेव शिंदे, संस्थेचे क्षेत्र समन्वयक वैभव आव्हाड, ए. टी. शिंदे, विजय शिंदे, संजय काकड, देवराम भोर, सोमनाथ शिंदे, सोपान शिंदे, रामनाथ शिंदे, आनंदा गुंड, उल्हास काकड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Water literacy campaign at Thangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी