दहावी उत्तीर्णांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा, वाटप लांबले ; आठवडाभरानंतरही शून्य नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:59 PM2020-08-06T15:59:36+5:302020-08-06T16:02:42+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी दि.२९ जुलैला जाहीर झाला असून,ऑनलाईन निकालाला आठवडाभराचा कालावधी उलटूनही  विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका प्रतिक्षा कायम आहे.

Waiting for marks for 10th pass, allotment is long; Zero planning even after a week | दहावी उत्तीर्णांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा, वाटप लांबले ; आठवडाभरानंतरही शून्य नियोजन

दहावी उत्तीर्णांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा, वाटप लांबले ; आठवडाभरानंतरही शून्य नियोजन

Next
ठळक मुद्देदहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतिक्षाआठवडा उलटूनही वितरणाचे नियोजन शून्य

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा ऑनलाइन निकाल बुधवारी दि.२९ जुलैला जाहीर झाला असून, ऑनलाईन निकालाला आठवडाभराचा कालावधी उलटूनही  विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका प्रतिक्षा कायम आहे. ऑनलाईन निकालाला आठ दिवसांचा कालावधी उलटूनही राज्य मंडळाने गुणपत्रिकांच्या वाटपाविषयी विभागीय मंडळाना कोणतेही नियोजन कळविलेले नसल्याने बारावी प्रमाणे दहावीच्या गुणपत्रिकांचे वितरणही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आ हे. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालाची प्रत अपलोड करण्याची सवलत दिली असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक विभागातून एकूण १ लाख ९७ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ५५७ म्हणजे ९३.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ८४ हजार ५५८ विद्यार्थ्यांचा समावेश असून धुळे २७ हजार ३३१, जळगाव ५५ हार २४० व नंदुरबार जिल्ह्यातील १८ हजार ३७८  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांच्या मूळ प्रतीची आवश्यकता भासणार आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिकेची प्रत अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Waiting for marks for 10th pass, allotment is long; Zero planning even after a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.