डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 04:31 PM2020-01-18T16:31:14+5:302020-01-18T16:31:42+5:30

येवला तालुका : उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या पाण्याने समाधान

Waiting for the catwalk water for the hills | डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देयेत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : बहुप्रतिक्षीत अशा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत येऊन ठेपले आहे तर येत्या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पाणी जाऊन पोहोचणार असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. सतत दुष्काळाचा शाप असलेल्या तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या मांजरपाडयाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरलेला आहे. यावर्षी मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत येऊन पोहोचल्याने तालुुक्याच्या उत्तरभागातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. येत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन भुजबळ मंत्रिपदी विराजमान झाल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या या प्रकल्पाबाबत आशा उंचावल्या आहेत. येवला तालुक्यातील कातरणी,विसापूर, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी ,गुजरखेडे, बाळापूर, साबरवाडी खैरगव्हान तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह परीसरातील गावामध्ये ार्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तर पेरणीयोग्य पाऊसही झालेला नव्हता त्यामुळे शेतकरीवर्गाचा जीव टांगणीला लागेलला असतानाच मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने परीसरातील जमिनीची भूक भागल्याने विहिरींना पाणी उतरले. या पाण्याच्या भरवशावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा, मका, कपाशी, मेथी यासह इतर नगदी पिकाचे नियोजन केले.
शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण
गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता मात्रया वर्षी विहिरींना पाणी चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. बेभरवशाचे असलेले कांदापीक या वर्षी मात्र शेतक-यांना लखपती करून गेले. कधी नव्हे तो कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचीही लागवड सुरू असून उन्हाळ कांद्यालाही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकºयांसोबतच मजूर वर्गही खुश असून मजुरीचे दरही वाढल्याने मजुरांच्या हातात चार पैसे जास्तीचे येऊ लागले आहेत.

Web Title: Waiting for the catwalk water for the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.