व्हीव्हीपॅटच्या मोजणीने झाली मतदानाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:04 AM2019-05-26T01:04:13+5:302019-05-26T01:04:35+5:30

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

 VVPAT counting ensures voting | व्हीव्हीपॅटच्या मोजणीने झाली मतदानाची खात्री

व्हीव्हीपॅटच्या मोजणीने झाली मतदानाची खात्री

Next

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. २३) ईव्हीएममधील मोजणीदेखील वेळेत पूर्ण झाली व त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी सुमारे तीन तास चालली. अशी एकूण २१ तास चाललेली प्रक्रिया निवडणूक यंत्रणेने अहोरात्र परिश्रम घेऊन पूर्ण केली. व्हीव्हीपॅटमध्ये फक्त उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या चिठ्यांचा समावेश असल्यामुळे त्यांची मोजणी अगदीच सुटसुटीत झाली. या मोजणी प्रक्रियेची ध्वनीचित्रफित काढण्यात आली असून उपस्थित असलेल्या उमेदवार व प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षकांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मोजणीस्थळी भेट देऊन कायदेशीर बाबींच्या पालनाची खात्री केली. विशेष म्हणजे ज्या मतदान केंद्रातील ईव्हीएमशी जोडलेल्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली, त्यातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यातील मते सारखीच निघााली. त्यामुळे मतदारांनी दिलेले मत त्यांच्या पंसतीच्या उमेदवाराला मिळाल्याची खात्री सर्व संबंधीतांना पटली व निरीक्षकांनीही त्याबाबत समाधान व्यक्त केले.
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत व्हीव्हीपॅटची मोजणी म्हणजे औपचारीकता ठरल्याची वार्ता प्रसिध्द झाली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या विहीत कार्यपध्दतीनेच आणि वैधानिकरीत्याच ही प्रक्रिया पार पडल्याचे आढळूून आले आहे.
लोकसभा निवडणुकीत आयोगाने ईव्हीएमसोबत यंदा पहिल्यांदाच वापर केलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रातील मतमोजणीमुळे आपले मत नेमके कोणाला गेले, याबाबत घेतल्या जात असलेल्या संशयाला पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे ही सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्यामुळे उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींसोबतच निवडणूक निरीक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Web Title:  VVPAT counting ensures voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.