नाशिक महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणूकीसाठी ९ जानेवारीस मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:59 PM2019-12-09T18:59:11+5:302019-12-09T19:02:21+5:30

नाशिक- महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर ९ जानेवारीस मतदान होणार आहे.

Voting for the by-elections of two divisions of Nashik Municipal Corporation on January 1 | नाशिक महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणूकीसाठी ९ जानेवारीस मतदान

नाशिक महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणूकीसाठी ९ जानेवारीस मतदान

Next
ठळक मुद्दे१६ डिसेंबर पासून अर्ज वितरण२३ डिसेंबर पर्यंत मुदत

नाशिक- महापालिकेच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या सोमवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर ९ जानेवारीस मतदान होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ ब मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली होती तर नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ ब मधील भाजप नगरसेवक सरोज आहिरे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. यानंतर सरोज आहिरे या आमदार म्हणून निवडून आल्या असल्या तरी दातीर यांचा मात्र पराभव झाला होता. आता या दोन्ही प्रभागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.

निवडणूकीची अधिसूचना येत्या १६ डिसेंबर रोजी जाहिर होणार असून त्याच दिवशी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. १६ ते २३ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. मात्र, २२ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असल्याने या दिवशी मात्र अर्ज स्विकारले जाणार नाही. २४ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल. २७ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल तर २७ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम वैध यादी घोषीत करण्यात येईल. ९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

 

Web Title: Voting for the by-elections of two divisions of Nashik Municipal Corporation on January 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.