१८ ग्रामपंचायतींसाठी ३१ आॅगस्टला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:58 AM2019-08-23T00:58:06+5:302019-08-23T00:58:26+5:30

मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ३१ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. सहा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

Voting for 2 Gram Panchayats on 7 August | १८ ग्रामपंचायतींसाठी ३१ आॅगस्टला मतदान

१८ ग्रामपंचायतींसाठी ३१ आॅगस्टला मतदान

Next
ठळक मुद्देनिवडणूक : सहा ठिकाणी यापूर्वीच बिनविरोध निवड

नाशिक : मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ३१ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. सहा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त असल्यामुळे अशा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयीन प्रकरणांमुळे सरपंच तसेच सदस्य पदाच्या रिक्त राहिलेल्या जागांच्या संदर्भात पोटनिवडणूक घ्यावी लागणार असल्यामुळे गेल्या १ तारखेलाच पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात २१ आॅगस्टपर्यंत २५ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी १८ ग्रामपंचायतींसाठीच मतदान होणार आहे. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान होणार आहे. नाशिक तालुक्यातील शिवणगाव व संसरी, बागलाण तालुक्यातील विसापूर, कपालेश्वर, तुंगनडिगर मालेगावमधील सातमाने, बेळगाव, दुंधे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता नाशिकमधील २ बागलाणमधील ८, निफाडमधील १, येवल्यातील ४ आणि मालेगाव तालुक्यातील ३ अशा एकूण १८ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बुधवारी झाली माघार
निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार दि. ९ ते १६ आॅगस्ट दरम्यान इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे मागविण्यात आली होती. या नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी (दि.१९) झाल्यानंतर बुधवारी (दि.२१) माघारी घेण्यात आल्या. यात सहा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.

Web Title: Voting for 2 Gram Panchayats on 7 August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.