इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:18 PM2020-10-26T15:18:19+5:302020-10-26T15:23:37+5:30

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या सौ विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.

Vimal Gadhve as the Deputy Chairman of Igatpuri Panchayat Samiti | इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे 

इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे 

googlenewsNext
ठळक मुद्देदहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची आज निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजू नाठे यांच्या पत्नी जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.
इगतपुरी पंचायत समीतीचे सभापतीपद हे आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपसभापतीपदाला विशेष महत्व आहे. त्यामुळे जिजाबाई नाठे यांनीही आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने उपसभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा होती. त्यासाठी शिवसेनेच्याच सौ विमलबाई गाढवे यांच्या नावाची प्रारंभीपासूनच चर्चा होती. त्याच चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले.
तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती सौ जया कचरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचायत समितीच्या निवड बैठकीत उपसभापती पदासाठी विमल गाढवे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने गाढवे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी सभागृहात पंचायत समिती मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे, विठ्ठल लंगडे, भगवान आडोळे, मच्छीन्द्र पवार, सोमनाथ जोशी , विमल तोकडे, कल्पना हिंदोळे कौसाबाई करवंदे, आदी सदस्य उपस्थित होते. निवडणुकीस सहायक म्हणून गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड सहायक बीडीओ भरत यंदे, आदीनी काम पाहिले
या निवडीप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, माजी जि प सदस्य जनार्धन माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जि प सदस्य हरिदास लोहकरे , सुनिल वाजे, माजी सभापती संपत काळे, कचरू डुकरे, पांडुरंग ब-हे, नंदलाल गाढवे, नामदेव गाढवे मोहन ब-हे,माजी तालुकाप्रमुख राजू नाठे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, मधुकर कोकणे, हरिभाऊ वाजे, पांडुरंग गाढवे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब सुराणा, देविदास जाधव, केरू पा देवकर उपस्थित होते.

एकाच गटाचा योगायोग ----
इगतपुरी तालुक्यात टाकेद - खेड गट हा नेहमीच प्राबल्यवाण ठरत असतो. निवडणुकीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या गटाने एकहाती विजय मिळविला होता. विशेष म्हणजे याच गटातील सौ जया कचरे या सभापती आहे तर सौ विमल गाढवे यांच्या रूपाने उपसभापतीपदही त्याच गटाकडे गेल्याने तालुक्याची धुरा व विकासाचा गाडा आता खेड गटाकडे असणार हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे हा योगायोग आहे. सिंधुबाई वाजे यांच्यानंतर दहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.

विमल गाढवे या शिवसेनेच्या वतीने जरी उपसभापतीपदी निवड झाल्या असल्या तरी या निवडीप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी  सहभागी झाले होते त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा या पक्षातील प्रमुख पदाधिकारी व समर्थक यांचा भरणा अधिक होता.


 

 

Web Title: Vimal Gadhve as the Deputy Chairman of Igatpuri Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.