Village cleaning campaign for donors | दात्याणेला गाव स्वच्छता माेहीम

दात्याने येथे ग्रामस्वच्छता करताना महिला.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आला.


सायखेडा : दात्याणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या संकल्पनेतून व महिला ग्रामसंघ, दात्याणे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आला.

स्वच्छता अभियानात गावातील महिला ग्रामसंघातील सरस्वती, झाशीची राणी, प्रगती, मरीमाता, जिजामाता, लक्ष्मी, जयमल्हार, शिवशक्ती, आदीशक्ती, जागृती, उडाण महिला स्वयंसाहाय्यता समूह या बचत गटांतील सर्व महिला व दाणेश्वर पॕनलचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ यांचाही सहभाग लाभला. विशेष म्हणजे गावातील महिलांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला व गाव नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी ग्रामसेवक भवरे यांनी स्वच्छता व प्लास्टिक बंदीविषयी माहिती दिली.

 

Web Title: Village cleaning campaign for donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.