ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:19 PM2020-08-16T22:19:31+5:302020-08-17T00:23:47+5:30

ओझर : ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Village Administrator K. T. Flag hoisting by Gadad | ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण

ओझर ग्रामपालिका येथे ध्वजारोहण करताना प्रशासक के. टी. गादड. समवेत ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर, रज्जाक मुल्ला, तुकाराम गवळी, अंबादास शेलार आदी.

Next
ठळक मुद्देओझर ग्रामपंचायत मैदान

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के. टी. गादड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा झाले नाही. दत्तात्रय देवकर यांनी आदल्या दिवशी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत कोविडच्या महामारीत सरकारी आदेशाचे पालन करून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत तिरंग्याला सलाम करण्याचे आवाहन केले होते.
यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.बी. देवकर, मंडल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, माजी उपसरपंच रज्जाक मुल्ला, तुषार कदम, विनोद शेटे, तुकाराम गवळी, अंबादास शेलार, संतोष सोनवणे, सुधीर शिंदे, जयंत गाडेकर, सुभाष शेजवळ, दिलीप ठुबे, सतीश सोनवणे, योगेश गोरे, रूपेश उबाळे, सोमनाथ महाले, संदीप कमोद, जगन्नाथ मंडलिक, विजय शेजवळ, संतोष नळवाडे, अनिल रायते, प्रवीण रायते, नीलेश शेळके, कैलास जाधव, विलास कदम यांच्यासह ग्रामपंचायत कमर्चारी उपस्थित होते.

शिवरे विद्यालय 
सिन्नर : निफाड तालुक्यातील शिवरे येथील क्रांतवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक व विद्यालयाचे पालक संचालक सुधाकरराव कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निफाड येथील व्ही. एन. नाईक. पतसंस्थेच्या वतीने विद्यालयाला सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी पंधरा हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. यावेळी संस्थेचे माजी संचालक अ‍ॅड. रामनाथ सानप, सरपंच गंगाधर वाघ, शिवाजीराव सानप, डॉ. अरुण कातकाडे, जनार्दन कराड, ई. के. भाबड उपस्थित होते.

वणी : येथील मराठा विद्या प्रसारक समाजसंस्था संचलित के.आर.टी. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण स्कूल कमिटीचे किसन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्काउट-गाईड ध्वजाचे ध्वजारोहण स्कूल कमिटी सदस्य माधव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदच्या सदस्य छाया गोतरणे, सरपंच सुनीता भरसट, उपसरपंच मनोज शर्मा, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास कड, भास्कर फुगट, राजेंद्र देशमुख, शिवाजी शेटे, निवृत्ती देवरे, मुख्याध्यापक डी.बी. चंदन, उपमुख्याध्यापक एस.जे. उफाडे, पर्यवेक्षक बी.एल. जाधव यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एल. कड यांनी केले. आभार पी .पी. टिळे यांनी मानले.

Web Title: Village Administrator K. T. Flag hoisting by Gadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.