कृषी मालाच्या उपलब्धतेबाबत सोसायट्यांनादेखील निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:54 PM2020-04-01T16:54:18+5:302020-04-01T17:00:43+5:30

नाशिक : नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन लागणा-या कृषी आणि कृषीपूरक व्यवसायातील मालाच्या उपलब्धतेतून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने कृषी आणि पूरक बाबींच्या उपलब्धतेचीदेखील पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच बॅँका आणि गृहनिर्माण सोसायट्यांनादेखील निर्देश देण्यात आले असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्तीसह सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. 

Vigilance on availability of agricultural goods | कृषी मालाच्या उपलब्धतेबाबत सोसायट्यांनादेखील निर्देश

कृषी मालाच्या उपलब्धतेबाबत सोसायट्यांनादेखील निर्देश

Next
ठळक मुद्देस्वतंत्र अधिकारी नियुक्त पुरेशी व्यवस्था

नाशिक : नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन लागणा-या कृषी आणि कृषीपूरक व्यवसायातील मालाच्या उपलब्धतेतून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने कृषी आणि पूरक बाबींच्या उपलब्धतेचीदेखील पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच बॅँका आणि गृहनिर्माण सोसायट्यांनादेखील निर्देश देण्यात आले असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्तीसह सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. 

नाशिक हा मूळातच कृषीनिर्मिती करणारा जिल्हा असल्याने आपल्या जिल्ह्यातच बहुतांश कृषी आणि कृषीपूरक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामुळे या उत्पादनांचेच व्यवस्थित वितरण कसे करता येईल, त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील महिनाभरात कशाचाही तुटवडा जाणवणार नाही, अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. 

कृषी व कृषीपूरक व्यवसाय  
     शहरात महानगरपालिकेने उपलब्ध करु न दिलेल्या जागांवर भाजीपाला व फळे उपलब्ध करु न देण्याची व्यवस्था नाशिक जिल्ह्यातील ४३ शेतकरी गटांमार्फत करण्यात आली आहे. या बाजार तळांवर समन्वय अधिकारी म्हणुन कृषी विभागाकडून ६ अधिकार्यांची नेमणुक करण्यात आली असून फळेभाजीपाला उपलब्ध करु न देणाºया शेतकरी गटांची व वाहतुक व्यवस्थेची माहिती वाहन क्र मांकासह संकलीत करण्यात येत आहे.  यासंदर्भातील पुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून किटकनाशके, खते, बियाणे यांची प्रत्येकी ४२ केंद्रे सुरु  आहेत. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी २१० वाहतुकदारांना शेतमाल वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. निफाड अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या सभासदांची कृषी सेवा केंद्रे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु  ठेवण्यात आली आहेत, असेही जिल्हाधिकारी मांढरे सगितले.

जीवनाश्यक शेतमालाचे खरेदी विक्र ी व्यवहार सुरु  ठेवण्यात आले आहेत. एकुण १५ बाजार समित्यांपैकी लासलगांव बाजार समितीसह ५ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव प्रक्रि या सुरु  आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी गृह निर्माण संस्था व बँकांनी त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनेटायझर ठेवणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करु न जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, संस्थेंच्या आवारात गर्दी न करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बँकामधील कामकाजाबाबत कामकाजाची वेळ, सोशल डिस्टंसिंग, एटीएम बाबतच्या सुचना, ग्राहक जागृती आदी बाबतीत संबंधित यंत्रणाना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.  
 

Web Title: Vigilance on availability of agricultural goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.