निवडणुकीसाठी २१ हजार मतदान यंत्रांच्या पडताळणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:50 AM2019-09-03T00:50:47+5:302019-09-03T00:51:04+5:30

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.

 Verification of 3,000 voting machines for election is complete | निवडणुकीसाठी २१ हजार मतदान यंत्रांच्या पडताळणीची कामे पूर्ण

निवडणुकीसाठी २१ हजार मतदान यंत्रांच्या पडताळणीची कामे पूर्ण

Next

नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यंत्रांच्या पडताळणी कामालाही वेग आलेला आहे. जवळपास २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे. विशेष सुटीच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांनी यंत्रे पडताळणीची कामे केली.
विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने निवडणूक कामात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष काळजी घेतली आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी निवडणूक संदर्भातील कामे केली. निवडणुकीसाठी ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे अंबड येथील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सदर मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी होणाºया निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. मतदानासाठी राज्यात मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम ही यंत्रे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुणे व बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. नाशिकला बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे मिळाली आहेत.
अचूक मतदार याद्यांसाठी मोहीम
जिल्हा निवडणूक विभागाने मतदारयादी आणि मतदान यंत्रे या दोन्ही कामाला एकाचवेळी सुरुवात केल्याने दोन्ही कामे वेळेत पूर्ण झालीच शिवाय नागरिकांपर्यंत मशीन वापरण्याबाबतची प्रात्यक्षिकेदेखील पोहचविता आली. सातत्याने अहोरात्र निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी कामकाज करीत असल्यामुळे निवडणुकीतील पारदर्शकता वाढणार आहे. पुढील महिन्यात कधीही निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा निवडणूक शाखा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर लागलीच विधानसभेसाठी कंबर कसलेल्या निवडणूक शाखेने सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून संपूर्ण जिल्ह्यात पारदर्शक आणि अचूक मतदार याद्यांसाठी मोहिमा राबविल्या आहेत.
सुटीच्या दिवशीदेखील कामे
धुळे लोकसभा मतदारसंघातून १ हजार ८६८ बॅलेट युनिट, ९३४ कंट्रोल युनिट व ९३५ व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. यापूर्वी सुमारे १० हजार मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली आहेत. अंबड येथे सुरू असलेल्या यंत्रे पडताळणी कामालादेखील वेग आल्याने जवळपास २१,२८७ यंत्राची तपासणी करण्यात आलेली आहे. सुटीच्या दिवशी कर्मचाºयांनी निवडणुकीच्या संदर्भातील कामे केली आहेत.

Web Title:  Verification of 3,000 voting machines for election is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.