भाज्यांचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:35 AM2019-09-19T00:35:12+5:302019-09-19T00:35:35+5:30

शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

 Vegetable prices plummeted | भाज्यांचे दर कडाडले

भाज्यांचे दर कडाडले

Next

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.
पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना विविध पकवानांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षास सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवसांत भाज्यांना मोठी मागणी असते. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे.
भाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, पालक, गवार, वाल, भोपळा यांचे भाव वाढले आहे.
दहा दिवसांपूर्वी भाज्यांचे भाव आवाक्यात होते, मात्र पावसाची सुरुवात होताच मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर झालेला दिसून येत आहे. तसेच कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्यामुळे कांद्याचे भावही गगणाला भिडत आहे. त्यामुळे त्यात पितृपक्षाची आता सुरुवात झाली असून, अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचे विक्रते सांगत आहेत.
तसेच पावसाचा जोर वाढला तर भाज्यांच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
नवरात्रात भाव वाढण्याची शक्यता
नाशिक जिल्हा पालेभाज्यांसह कांद्याच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला होता तेव्हाही भाज्यांचे दर गगणाला भिडले होते. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दर पुन्हा आवाक्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, त्यामुळे काही भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढविण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढत असून, त्याप्रमाणात आवक नसल्यामुळे परिणामी भाव वाढवावे लागत आहे. यामध्ये जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे.
- विजय डावरे, भाजीविक्रेता

Web Title:  Vegetable prices plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.