राजकीय वादातून भाजीबाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:21 PM2020-07-14T17:21:03+5:302020-07-14T17:27:28+5:30

कोरोनामुळे मुळातच बाजारपेठ ठप्प असताना आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार राजकीय वादामुळे महापालिकेला बंद करावा लागला आहे. १ जुलैपासून हा बाजार बंद असल्याने त्यामुळे विक्रेत्यांचे तर हाल होत आहेत; परंतु नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. त्यांंना भाजी खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे.

Vegetable market closed due to political dispute | राजकीय वादातून भाजीबाजार बंद

राजकीय वादातून भाजीबाजार बंद

Next
ठळक मुद्देगंगापूररोडवरील प्रकार नागरिकांची तोडगा काढण्याची मागणी

नाशिक : कोरोनामुळे मुळातच बाजारपेठ ठप्प असताना आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार राजकीय वादामुळे महापालिकेला बंद करावा लागला आहे. १ जुलैपासून हा बाजार बंद असल्याने त्यामुळे विक्रेत्यांचे तर हाल होत आहेत; परंतु नागरिकांचीदेखील अडचण होत आहे. त्यांंना भाजी खरेदीसाठी भटकंती करावी लागत आहे.
गंगापूररोडवरील भाजीबाजार परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यांना येथील राजकीय वादाशी नागरिकांना काही घेणे नाही. मात्र आपल्या सोयीचे भाजीविक्रेत्यांना मंडईत जागा मिळावी यासाठी राजकारण सुरू आहे. आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजार मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्यात स्थानिक शेतकऱ्यांऐवजी बाहेरील विक्रेत्यांचीच संख्या वाढत गेली. याठिकाणी भाजी मंडईचे आरक्षण असल्याने त्याठिकाणी बºयाच गोंधळानंतर मंडई बांधली आहे. त्यापूर्वी फेरीवाला सर्वेक्षण करण्यात आले. त्यात येथील विक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात आली होती. परंतु मंडई बांधल्यानंतर मात्र जुने-नवे वाद सुरू झाला. स्थानिक राजकीय नेत्यांनी त्यावर गोंधळ घातला. त्यामुळे त्यावर तोडगा निघालेला नाहीच. परंतु आपल्याकडील विक्रेत्यांना मंडईत जागा मिळत नाही म्हणून काही राजकीय नेत्यांनी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यावर दबाव आणून हा बाजार बंद केला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराजवळील भाजीबाजारातूनच भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यात या राजकीय वादातून गेल्या १ जुलैपासून भाजीबाजार बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाला नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय नेत्यांचे दबाव महत्त्वाचे वाटतात का? असा प्रश्न केला जात आहे.
गंगापूररोड भागातील नागरिकांसाठी जवळपास भाजीबाजार नाही. सध्याचा भाजीबाजार वाढत तो अगदी प्रसाद सर्कलपर्यंत गेला असला तरी तो सोयीचा ठरत होता. आता बाजार बंद झाल्याने नागरिकांना थेट आनंदवल्ली किंवा शरणपूर भाजी मार्केटमध्ये जावे लागते. त्यामुळे गंगापूररोडवरील भाजीबाजार त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Vegetable market closed due to political dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.