बाजारतळावर भाजीबाजारास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:45 PM2020-04-07T23:45:28+5:302020-04-07T23:45:57+5:30

ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून बाजारतळ येथे कुणीही भाजीपाला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विक्र ीचे अथवा खरेदीचे दुकान / स्टॉल लावू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.

Vegetable on the Market | बाजारतळावर भाजीबाजारास मज्जाव

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर भाजीबाजारासाठी करण्यात आलेली आखणी.

Next
ठळक मुद्देलासलगाव : आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

लासलगाव : येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून बाजारतळ येथे कुणीही भाजीपाला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विक्र ीचे अथवा खरेदीचे दुकान / स्टॉल लावू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाने ठरवून दिलेल्या सरस्वती विद्यामंदिर पटांगण, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगण, कोटमगाव रोड, शिवकमल मंगल कार्यालय, किल्ल्याच्या पाठीमागे अनिल सोनवणे यांच्या घरासमोर, स्टेशन रोड, बँक आॅफ बडोदासमोर शेतकरीवर्गाने शेतमाल सोशल डिस्टन्स तसेच मास्कचा वापर करून विक्री करावा.
या व्यतिरिक्त शेतमाल, भाजीपाला खरेदी-विक्री करताना आढळून आल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अन्वये निर्गमित केलेल्या अधिसूचना व नियमावलीनुसार तसेच संचारबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिला आहे.

Web Title: Vegetable on the Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.