शहिद यशवंत ढाकणे स्मृतीदिनी दिंडोरीत राबविले विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:06 PM2020-08-03T17:06:35+5:302020-08-03T17:10:55+5:30

दिंडोरी : सीमेवर भारत मातेचे रक्षण करताना शहिद झालेले तालुक्यातील तळेगावचे सुपुत्र यशवंत ढाकणे यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Various activities carried out in Dindori on the occasion of Martyr Yashwant Dhakne Smriti | शहिद यशवंत ढाकणे स्मृतीदिनी दिंडोरीत राबविले विविध उपक्रम

शहिद यशवंत ढाकणे स्मृतीदिनी दिंडोरीत राबविले विविध उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देशहीद यशवंतच्या आई-वडील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दिंडोरी : सीमेवर भारत मातेचे रक्षण करताना शहिद झालेले तालुक्यातील तळेगावचे सुपुत्र यशवंत ढाकणे यांना व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक भगवंत चकोर, प्राचार्य डॉ. संजय सानप, यशवंत ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे, आई, बबाबाई ढाकणे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे, सुनील आव्हाड, दत्तात्रय ढाकणे, चंद्रकांत धात्रक, ललिता खांदवे आदी उपस्थित होते. शहीद यशवंतच्या आई-वडील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जनता इंग्लिश स्कुल
दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये शहीद यशवंत ढाकणे यांचा स्मृतिदिन निमित्त शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, अनिल देशमुख, माजी सैनिक एस. एम. क्षीरसागर, गणपत जाधव, प्रकाश जाधव प्राचार्य बी. जी. पाटील, शालेय समिती सदस्य सुभाष बोरस्ते, मनोज ढिकले, उपमुख्याध्यापक यु. डी. भरसठ, पर्यवेक्षक बी. बी. पुरकर आदींच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता १० वी मध्ये प्रथम क्र मांक मिळविणाऱ्या कोमल फुगे व सृष्टी धुमणे यांचा माजी सैनिक संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पिंपळणारे विद्यालय
पिपळणारे येथील पी. डी. विद्यालयात शहिद यशवंत ढाकणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे, कृउबा समिती संचालक वाळू जगताप,उपसरपंच अजित खांदवे, चिंतामण खांदवे, आर. के. खांदवे, सदाशिव खांदवे, शिवाजी बोराडे, संपत पाटील, मुख्याध्यापक पी. टी. गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दावीत प्रथम पाच येणाºया विद्यार्थ्यांना पुष्प व मास्क देऊन सन्मान करण्यात आला.
 

Web Title: Various activities carried out in Dindori on the occasion of Martyr Yashwant Dhakne Smriti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.