तांदळाचीबारीच्या डोहात श्रमदानातून बांधला वनराई बंधारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 06:45 PM2020-11-22T18:45:53+5:302020-11-22T18:46:34+5:30

पेठ : तालुक्यातील तांदळाचीबारी, चोळमुख, शिंगदरी, डोलारमाळ परिसरात जलपरिषद तसेच कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार असून तांदळाबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

Vanrai dam built through hard work in Tandalachibari pond! | तांदळाचीबारीच्या डोहात श्रमदानातून बांधला वनराई बंधारा !

तांदळाचीबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधारा बांधतांना ग्रामस्थ समवेत जलपरिषद सदस्य.

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ : जलपरिषदेचा उपक्रम : परिसरात बांधणार ११ वनराई बंधारे

पेठ : तालुक्यातील तांदळाचीबारी, चोळमुख, शिंगदरी, डोलारमाळ परिसरात जलपरिषद तसेच कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार असून तांदळाबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
पेठ तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल तसेच पेठच्या काही भागात ग्रामस्थांच्या श्रमदानातून तसेच जलपरिषद अंतर्गत वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. तांदळाचीबारी येथील धुलाई नदी पात्रातील चिंचोळा डोहात ग्रामस्थ तसेच जलमित्रांच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. तांदळाचीबारीसह अजून परिसरातील डोलारमाळ, शिंगदरी, चोळमुख येथे कृषी विभाग तसेच जलपरिषद अंतर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानातून अजून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे. यामुळे बांधण्यात येणारे वनराई बंधारे या भागासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हरसूल,पेठ मधील काही गावांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाणीटंचाई भेडसावत आहेत.यामुळे वनराई सारख्या बंधाऱ्यांची निर्मिती करून या भागातील तात्पुरता स्वरूपातील पाणीटंचाई मात होणार आहे.

या वनराई बंधाऱ्याच्या श्रमदानाप्रसंगी यशवंत तांदळे, लक्ष्मण तांदळे, तुळसाबाई पारधी, महेंद्र तांदळे, भगीरथ तांदळे, जलपरिषदचे सदस्य अशोक तांदळे, अनिल बोरसे, हुशार हिरकुड, केशव बोरसे, पोपट महाले, हर्षल गाढवे, जगन तांदळे, दत्तू तांदळे, एकनाथ तांदळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तांदळाचीबारी परिसरात अजून ११ वनराई बंधाऱ्यांची ग्रामस्थ,कृषी विभाग तसेच जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.यामुळे येथील भागासाठी हे उपयुक्त ठरणारे आहेत.
तुषार गवळी,कृषी सहाय्यक

वनराई बंधारा हा नदी पात्रातील उपयुक्त असून बांधताक्षणी जनावरे, कपडे धुण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. जलपरिषद लाख मोलाचे काम करीत आहे. त्याचा खुप अभिमान वाटतो.
- यशवंत तांदळे, ग्रामस्थ ,तांदळाचीबारी.

 

Web Title: Vanrai dam built through hard work in Tandalachibari pond!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.